Soybean Crop Insurance : सोयाबीनचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Crop Insurance Scheme : नांदेडमध्ये खरिपात सर्वाधिक साडेचार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने शासनाला कळविली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेडमध्ये खरिपात सर्वाधिक साडेचार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने शासनाला कळविली आहे. परंतु शेतकऱ्यांनी विमा भरताना सोयाबीनचे क्षेत्र सहा लाख १९ हजार ११८ हेक्टरसाठी भरला आहे.

यामुळे पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्रात तब्बल एक लाख ६८ हजार हेक्टरचा फरक येत आहे. यामुळे कृषी विभागाचा पेरणीचे क्षेत्र आणि पीकविमा भरलेल्या क्षेत्रात मोठी तफावत जाणवत आहे.

नांदेड जिल्ह्यात खरिपातील पेरणीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने नुकताच राज्य शासनाला कळविला आहे. यात सात लाख ६६ हजार ८०१ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १००.८ टक्क्यांनुसार सात लाख ६७ हजार ४१२ हेक्टरवर पेरणी झाल्याचे कळविले आहे.

यात नांदेडमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र तीन लाख ५४ हजार ३१४ हेक्टर असल्याचे नमूद केले आहे. यानुसार जिल्ह्यात अंतिम पेरणी १२७.६७ टक्क्यांनुसार चार लाख ५१ हजार ७६४ हेक्टरवर झाल्याचे कळविले आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्याचा शेतकरी हिस्सा आकस्मिक निधीतून

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र सोयाबीन पिकाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सोयाबीन पिकांचा विमा उतरविला. पीकविमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आठ लाख २३ हजार ७७७ अर्जदार शेतकऱ्यांनी तब्बल सहा लाख १९ हजार ११८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज एक रुपयानुसार आठ लाख २३ हजार ७५५ रुपये भरले आहेत.

Crop Insurance
Soybean Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांना ४० कोटींचा अग्रिम पीकविमा मंजूर

तर राज्य शासनाचा ३३७ कोटी ६९ लाख, तर केंद्र शासनाचा२८४ कोटी ५० लाख असा एकूण ६०७ कोटी ३६ लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा होणार आहे. दरम्यान, सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रापेक्षा शेतकऱ्यांनी तब्बल एक लाख ६८ हजार हेक्टरची तफावत दिसून येत आहे. यामुळे कृषी विभागाचा पेरणी अहवाल चुकला का शेतकऱ्यांनी सोयाबीनची अधिक क्षेत्रावर पेरणी केली, याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे.

इतर पिकांचे क्षेत्र जास्त, तर विमा संरक्षित क्षेत्र कमी

जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र कमी तर विमा संरक्षित क्षेत्र अधिक दिसत असले तरी दुसरीकडे मात्र विमा क्षेत्र कमी आणि पेरणी क्षेत्र अधिक दिसून येत आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीचे पेरणी क्षेत्र ११ हजार ७०४ हेक्टर आहे.

तर ज्वारीसाठी विमा केवळ चार हजार ३४५ हेक्टरचा भरला आहे. तुरीचे पेरणी क्षेत्र ६६ हजार हेक्टर असताना तुरीसाठी केवळ १२ हजार ४५१ हेक्टरचा विमा उतरविला आहे, तर कपाशीची लागवड दोन लाख पाच हजार हेक्टरवर झाली आहे, परंतु कपाशीसाठी विमा ८१ हजार ६२९ हेक्टरचा उतरविल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com