Crop Damag Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Rate : सोयाबीनच्या उत्पादनात ५२ टक्के घटीची शक्यता

यंदा ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या सहा तालुक्यांतील एकूण ८ मंडलांमध्ये २१ हून अधिक दिवस पावसाचा खंड पडला. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५२ ते ५७ टक्के घट अपेक्षित आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः यंदा ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या सहा तालुक्यांतील एकूण ८ मंडलांमध्ये २१ हून अधिक दिवस पावसाचा (Rain) खंड पडला. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात (Soybean Production) मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५२ ते ५७ टक्के घट अपेक्षित आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखीम अंतर्गत सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाईतून २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचंल गोयल यांनी दिले आहेत. त्यासाठी शुक्रवारी (ता.९) अधिसूचना काढली आहे.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई निश्‍चित करण्याच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील अधिसूचित विमा क्षेत्र (मंडळ) घटकातील सोयाबीन या अधिसूचित पिकाच्या प्रातिनिधिक सूचकांच्या (त्यात पीक परिस्थिती अहवाल, पर्जन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचे वार्तांकन, दुष्काळ सदृश परिस्थिती) आधारे राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून शुक्रवारी (ता.९) अहवाल सादर केला. त्यानुसार सहा तालुक्यातील झरी, जांब, सिंगणापूर, दूधगाव, रामपुरी बुद्रुक, सोनपेठ, माखणी, चुडावा या ८ मंडलांतील सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन हे मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे अपेक्षित उत्पादन ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन पिकासाठी ८ महसूल मंडलांतील सर्व पीकविमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी. या ८ मंडलांतील विमाधारक शेतकरी हंगामाच्या पीक कापणी प्रयोगाद्वारे येणाऱ्या उत्पादनाच्या आधारे निश्‍चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील. नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

सोयाबीन उत्पादकता स्थिती (प्रतिहेक्टरी क्विंटलमध्ये)

मंडल सरासरी उत्पादन यंदाचे अपेक्षित उत्पादन उत्पादन घट (टक्के)

झरी ९.८१ ४.७० ५२

सिंगणापूर ९.११ ४.२८ ५३

जांब १०.१४ ४.७६ ५३

दूधगाव ८.४० ३.७८ ५५

रामपुरी बुद्रूक ८.५० ३.९९ ५३

सोनपेठ ६.६२ ३.०४ ५४

माखणी ७.६० ३.४९ ५४

चुडावा ८.६७ ३.७५ ५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT