Soybean Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Crop Damage : वाशीममध्ये पावसाचा सोयाबीनला फटका

परतलेल्या पावसामुळे सोयाबीनचे आगार असलेल्या वाशीम जिल्ह्यात या पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्हे वाढला आहेत.

टीम ॲग्रोवन

वाशीम ः परतलेल्या पावसामुळे सोयाबीनचे आगार (Soybean Hub) असलेल्या वाशीम जिल्ह्यात या पिकाला मोठा फटका (Soybean Crop Damage) बसण्याची चिन्हे वाढला आहेत. सर्वत्र सोयाबीन कापणीने (Soybean Harvesting) वेग घेतलेला असतानाच दसऱ्याच्या रात्री दाखल झालेल्या पावसाने सोयाबीनचे पीक (Soybean Crop) कात्रीत पकडले आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

जिल्ह्यात या वर्षी पेरणीपासून पावसाने पिच्छा सोडलेला नाही. सलग दोन ते अडीच महिने पाऊस सुरू होता. त्यामुळे खरिपातील महत्त्वाचे पीक सोयाबीन हातून जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. नैसर्गिक संकटातून कसेबसे वाचलेले सोयाबीनचे पीक काढणीला आले.

गेल्या आठवड्यापासून सोयाबीन काढणीचा हंगाम जोमात आला. त्यातच ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवू लागला. तापमानात चांगली वाढ झाली होती. जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेती कामांनी वेग धरला. दसऱ्यापूर्वी अनेकांचे सोयाबीन काढून झाले. अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची सोयाबीनची कापणी झाली. परंतु बुधवारी (ता. ५) रात्रीपासून अचानक परतीच्या पावसाला सुरुवात झाली.

सलग झालेल्या पावसामुळे कापणी झालेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी ऐन काढणीच्या हंगामात सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसत असल्याचा अनुभव आहे. या वर्षीही अशीच परिस्थिती ओढवली आहे. मागील तीन, चार वर्षांत दरवर्षी काढणीला आलेले सोयाबीन परतीच्या पावसाच्या हाती सापडत आलेले आहे.

दसऱ्याच्या सायंकाळी जिल्हाभर पावसाने धूळधाण उडवली होती. मंगरूळपीर, मानोरा, वाशीम व मालेगाव तालुक्यांतील अनेक गावांना पावसाचा फटका बसला. नदी-नाल्यांना पूर आले. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी दिल्याने शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सोयाबीन सोंगणीच्या हंगामाला फटका बसला. कामे थांबली आहेत.

मंगरूळपीर, मानोऱ्यात पाऊस

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार मंगरूळपीर तालुक्यातील शेलू खुर्द, मंगरूळपीर, पार्डी तड, पोटी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या मंडलांमध्ये ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. तालुक्यात सरासरी ५३.८ मिलिमीटर पाऊस झाला. मानोरा तालुक्यात सरासरी ४३.१ मिलिमीटर पाऊस नोंदवल्या गेला. या तालुक्यात मानोरा ४४, इंझोरी ५४, कुपटा ५४, शेंदुर्जना ३५, गिरोली ४५.३ असा दमदार पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health: खुरांच्या आरोग्यासाठी जनावरांना द्या संतुलित आहार

Pulse Production: कडधान्य उत्पादन वाढीत बदनापूर केंद्राची महत्त्वाची भूमिका; ठोंबरे 

Beed Farmers: बीडमध्ये ५३ शेतकऱ्‍यांच्या प्रक्षेत्रावर ‘समूहप्रथम दर्शनी’मधून प्रात्यक्षिके

Corona Virus Immunity: विषाणूंना रोखणारी नवी उपचार पद्धती विकसित

Zero Tillage Farming: शून्य मशागत तंत्रातून गवसला यशाचा मार्ग

SCROLL FOR NEXT