Pune News : पावसाचा जवळपास महिना झाला आहे. या काळात पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, पूर्व भागातील तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यातच शनिवारपासून (ता.१) पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. रविवारी (ता.२) दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. या भागात पाऊस पडेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असला तरी पूर्वेकडील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. या भागात अजूनही जोरदार पाऊस पडला नसल्याने पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.
पश्चिम भागातील वेल्हा येथे ११०.३ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे ३२.५, विंझर १८.५, आंबवणे २२.५ मिलिमीटर पाऊस पडला. मावळमधील लोणावळा येथे ८८.५ मिलिमीटर पाऊस पडला. कार्ला येथे ७३.५, खडकाळा ५८.५, काले ३६.३, शिवणे ३०.८ मिलिमीटर पाऊस पडला.
तर वडगाव मावळ, तळेगाव येथे हलका पाऊस बरसला. भोरमधील निगुडघर येथे ६४ मिलिमीटर, भोलावडे ३२.३, नसरापूर २४, आंबवडे २४.५ मिलिमीटर पाऊस पडला.
हवेलीतील कळस येथे १४.८ मिलिमीटर पाऊस बरसला. कोथरूड १३ मिलिमीटर तर खेड ११, भोसरी येथे १०.३ मिलिमीटर पाऊस पडला.
मुळशीतील पौड १५.३, घोटावडे १५.३, थेरगाव, माले ५७.८, मुठे ४४.३, पिरंगुट १३.०, जुन्नरमधील राजूर २०.८, डिंगोरे १९.८, जुन्नर १९.५, ओतूर येथे १९.५ मिलिमीटर पाऊस पडला. आंबेगाव येथे ५३ मिलिमीटर पाऊस झाला.
शिरूर,बारामती, इंदापूर, पुरंदरमध्ये हलक्या सरी
शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा भागात हलक्या सरी पडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.