Summer Fodder Crop
Summer Fodder Crop Agrowon
ताज्या बातम्या

उन्हाळी चारा पिकांची १७ हजार हेक्टरवर पेरणी

टीम ॲग्रोवन

पुणे ः उन्हाळी हंगामात चारा पिकांची (Summer Fodder Crop) मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे चारा पिकांच्या क्षेत्रात (Fodder Crop Acreage) चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत १७ हजार १७० हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. येत्या काळात जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल. मे, जून महिन्यांत चाराटंचाई फारशी भासणार नसल्याचे चित्र आहे.

जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी, तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो. या शिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात. आता गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

मागील चार ते पाच वर्षांपूर्वी चाराटंचाईमुळे जनावरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्‍भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहेत. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकांसारख्या चारा पिकांचे बियाणे देण्यात येते. यंदा नगर जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार ४८१ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात तीन हजार ४१३ हेक्टरवर, तर सोलापूर जिल्ह्यात नऊ हजार २७७ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे.

पुणे विभागात पीकनिहाय चारा पिके (हेक्टर)

पीक --- झालेली पेरणी

मका --- ७,५२९

कडवळ --- ४,९६३

बाजरी --- ४९

लुसर्नग्रास --- ८,४४

नेपिअरग्रास --- १,७६७

इतर चारा पिके --- २,०१९

एकूण --- १७,१७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT