Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : खानदेशात पेरण्या पूर्णत्वाकडे; सर्वाधिक कापूस पीक

Kharif Season 2023 : खानदेशात पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. सुमारे पाच टक्के क्षेत्र यंदा नापेर राहणार आहे. त्यात कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. सुमारे पाच टक्के क्षेत्र यंदा नापेर राहणार आहे. त्यात कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती आहे. पेरणी व लागवड ९२ टक्क्यांवर झाली आहे.

खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी, लागवड यंदा अपेक्षित होती. जळगाव जिल्ह्यात सात लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यंदा फक्त उडीद, मुगाची पेरणी अपेक्षेएवढी झालेली नाही. परंतु सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी आदींची पेरणी बऱ्यापैकी आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड काहीशी कमी आहे. ही लागवड मागील वर्षी पाच लाख ६७ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड साडेपाच लाख हेक्टरवर पोहोचली आहे. सोयाबीनची पेरणी खानदेशात ३० ते ३१ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. एवढी पेरणी झाल्याची माहिती आहे.

अनेकांनी कापसाऐवजी सोयाबीनची पेरणी केली. काहींनी कापसाची लागवड कमी केली. यामुळे सोयाबीनखालील क्षेत्रही स्थिर आहे. ज्यांना सोयाबीन पेरणीची मुदत सापडली नाही, त्यांनी तूर, मक्याची लागवड केली आहे. पाऊसही बऱ्यापैकी असल्याने उगवण अपवाद वगळता अनेक भागांत पूर्ण झाली आहे.

यंदा पाऊस उशिरा म्हणजेच अनेक भागात ६ जुलैनंतर आता. काही भागांत ६, ७, ८ जुलै दरम्यान झालेला पाऊस कमी किंवा पेरणीयोग्य नव्हता. तर काही भागांत या काळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीनच्या लागवडीला वेग आला होता. १५ जुलैपर्यंत सर्वत्र कमी, अधिक पाऊस होता. यामुळे सर्वत्र पेरण्यादेखील सुरू झाल्या.

खानदेशात कोरडवाहू कापसाखील क्षेत्र सुमारे सात लाख हेक्टर एवढे आहे. तर सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पिकाखाली आहे. कापसाची लागवड यंदा नऊ लाख हेक्टर एवढी अपेक्षित होती. परंतु कमी दर व वाढता खर्च यामुळे अनेकांनी लागवड कमी केली आहे. यामुळे लागवड काहीशी कमी दिसत आहे. कोरडवाहू कापूस पिकही बऱ्यापैकी आहे. लागवड काहीशी उशिरा झाल्याने लवकर उत्पादन देणाऱ्या

कापूस वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. ताग, बाजरी या पिकांची पेरणी पुढील आठवड्यात सुरू होईल. यामुळे पेरणीची अंतिम माहिती पुढील महिन्यात समोर येईल. परंतु कापूस, सोयाबीन, तुरीची लागवड पूर्ण झालेली आहे, अशीही माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT