Kharip Sowing
Kharip Sowing Agrowon
ताज्या बातम्या

पुरेशा पावसाअभावी पेरणी लांबणीवर

अॅग्रोवन वृत्तसेवा

परभणीः यंदाच्या पावसाळ्यात रविवार (ता. १९) पर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी ६४.३ मिलिमीटर आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरी ५६.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यांत अद्याप सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी खरीप पिकांच्या पेरणी (Kharip Sowing) लांबणीवर पडली आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. परंतु पुरेशा ओलाव्या अभावी बियाण्याची उगवण व्यवस्थित होत नसल्याने दुबार लागवडीचे सावट आहे.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख २२ हजार ५२४ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात रविवार (ता. १९) पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरासरी ६४.३ मिमी पाऊस झाला आहे.त्यात परभणी तालुक्यात सरासरी ३८ मिमी, जिंतूर तालुक्यात ५६.३ मिमी, सेलू तालुक्यात ६०.७ मिमी, पाथरी तालुक्यात ५२.९ मिमी, सोनपेठ तालुक्यात ९६.१ मिमी, गंगाखेड तालुक्यात १०४ मिमी, पालम तालुक्यात ८९.८ मिमी, पू्र्णा तालुक्यात ४६.५ मिमी पाऊस झाला आहे.

गंगाखेड वगळता अन्य तालुक्यांमध्ये १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्याभरात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत आहे. परंतु सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झाले नाही. सिंचनाची सुविधा असलेल्या तसेच पाऊस पडण्याच्या अपेक्षेने जोखीम पत्करून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ५३ जार ६२४ हेक्टरवर पेरणी (Kharip Sowing) प्रस्तावित आहे.

जिल्ह्यात रविवार (ता.१९) पर्यंत सरासरी १०७.२ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरासरी ५६.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यात हिंगोली तालुक्यात सरासरी ७३.५ मिमी, कळमनुरी तालुक्यात सरासरी ३५.४ मिमी, वसमत तालुक्यात सरासरी ५५ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यात सरासरी ६७.९ मिमी, सेनगाव तालुक्यात सरासरी ५२.७ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप चांगला पाऊस न झाल्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT