Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : अमरावतीत पेरणी ९६ टक्के; कर्जवाटप ८८ टक्के

Crop Loan : खरीप हंगामात सरासरी ९६ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र बँकांकडून पीककर्ज वाटप सुरूच असून, उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामात सरासरी ९६ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र बँकांकडून पीककर्ज वाटप सुरूच असून, उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. १ लाख ८ हजार २५० शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.

यंदा खरिपासाठी १४५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकेचा यामध्ये ५६५ कोटींचा हिस्सा आहे. तर राष्ट्रीय बँका ७९३.७५ कोटी व खासगी बँकांसाठी ७३.७५ कोटींचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले.

१ एप्रिलपासून कर्जवितरणास प्रारंभ करण्यात आला. एकूण १ लाख ८२ हजार ३०० सभासद पात्र होते. त्यातुलनेत १ लाख ८ हजार २५० शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. १२७१ कोटी ३२ लाख रुपये कर्जवितरण आतापर्यंत झाले आहे. राष्ट्रीय बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ८३ टक्के, बँकांनी ४४, ग्रामीण बँकेने १११ व जिल्हा सहकारी बँकेने १०० टक्के वितरण केले आहे.

कर्जवितरणाची स्थिती (कोटी रुपये)

बँक लक्ष्यांक कर्जवाटप टक्केवारी सभासद

राष्ट्रीय बँक ७९३.७५ ६५६.३३ ८३ ५२,२७१

खासगी बँक ७३.७५ ३२.५८ ४४ १९११

ग्रामीण बँक १७.५० १९.३४ १११ १४५७

जिल्हा सहकारी ५६५ ५६३.०७ ९९.६५ ५२,६११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Trade Agreement: मुक्त व्यापार करारात शेती, डेअरीला संरक्षण

Debt Relief Fund: कर्जमुक्तीसाठी केवळ ५०० कोटी

Citrus Pest Management: कीड, रोगांचे धोके वेळीच ओळखून व्यवस्थापन करा

Purandar Airport: पुरंदर विमानतळामुळे विकासाला प्रोत्साहन

Chandrapur Kidney Sale Case: सोलापुरातील रामकृष्णने विकल्या दहा किडन्या

SCROLL FOR NEXT