Soybean Crop Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing: खरिपात सात लाख हेक्टरवर पेरा

यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.९० टक्क्यांनुसार सात लाख ६६ हजार १२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मधील पेरणीचा अंतिम (Crop Sowing) अहवाल नुकताच शासनाला सादर झाला आहे. यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.९० टक्क्यांनुसार सात लाख ६६ हजार १२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. (Soybean SOwing)

यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार १२ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे.

यंदा मृग नक्षत्रात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. यानंतर झालेल्या पावसामुळे जूनच्या शेवटी तसेच जुलैमध्ये सर्वत्र पेरण्यांना सुरवात झाली. यंदा जुलैमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाली.

यामुळे खरिपातील सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांना बाधा पोचली. दरम्यान जिल्ह्यात सात लाख ६६ हजार ८०९ सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.९० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यात सर्वाधीक चार लाख ४७ हजार ३९७ हेक्टरवर सोयाबीन,

एक लाख ८२ हजार २७९ हेक्टरवर कपाशी, ६९ हजार ४८४ हेक्टरवर तूर, २३ हजार २५२ हेक्टरवर लागवड झाली आहे.जिल्ह्यात खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

एक लाख ८२ हजार २७९ हेक्टरवर कपाशी, ६९ हजार

४८४ हेक्टरवर तूर, २३ हजार २५२ हेक्टरवर लागवड झाली आहे.

जिल्ह्यात खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ४४,७४० १८,९५९ ४२.३८

मका ८२३ ५३७ ६५.२५

तूर ६७,४२३ ६९,४८४ १०३.०६

मूग २७,३९२ २३,२५२ ८४.८९

उडीद २९,६२५ २२,१६८ ७४.८३

सोयाबीन ३,५३,३१४ ४,४७,३९७ १२६.६३

कपाशी २,४१,२८२ १,८२,२७९ ७५.५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT