Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : सोनहिरा’चा ३०६० रुपये पहिला हप्ता

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाला येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन ३०६० रुपये देण्यात यणार आहे.

Team Agrowon

कडेगाव, जि. सांगली ः डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory ) गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाला येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन ३०६० रुपये (Sugarcane Rate) देण्यात यणार आहे. राज्यात सर्वाधिक पहिला हप्ता देणारा ‘सोनहिरा’ हा एकमेव कारखाना (Sonhira Sugar Mill) ठरला आहे, अशी माहिती अध्यक्ष आमदार मोहनराव कदम व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

श्री. कदम म्हणाले, की हंगामात १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू हंगामात आतापर्यंत २ लाख ९६२ टन गाळप केले आहे. २ लाख २६ हजार ४३० साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून सरासरी उतारा ११.४९ टक्के आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याचे कामकाज पारदर्शक व शेतकरीहिताचे दृष्टीने सुरू आहे.

भविष्याचा विचार करून जास्तीत जास्त इथेनॉल उत्पादनाच्या दृष्टीने डिस्टिलरी विस्तारीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गळितासाठी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा. उपाध्यक्ष पंढरीनाथ घाडगे, संचालक रघुनाथराव कदम, कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह संचालक, खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

‘एफआरपी’प्रमाणे उर्वरित रक्कम हंगाम समाप्तीनंतर

चालू गळीत हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता किती द्यावयाचा, यासाठी कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष मोहनराव कदम व माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. १) सर्व संचालक मंडळाची सभा पार पडली.

तीमध्ये प्रतिटन ३०६० रुपयांचा पहिला हप्ता देण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. ‘एफआरपी’प्रमाणे ऊसबिलाची उर्वरित रक्कम गळीत हंगामाच्या समाप्तीनंतर शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT