Solar Energy Agrowon
ताज्या बातम्या

Solar Power For Poultry : पोल्ट्रीला मिळणार सौरऊर्जेचा प्रकाश; माहिती संकलन सुरू

Poultry Farming : राज्यात पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी होते. त्यामुळे उत्पादकता खर्च वाढत असल्याने कृषिपंपाच्या धर्तीवर वीजबिल आकारणीची मागणी होती.

Team Agrowon

Nagpur News : राज्यात पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी होते. त्यामुळे उत्पादकता खर्च वाढत असल्याने कृषिपंपाच्या धर्तीवर वीजबिल आकारणीची मागणी होती. पशुसंवर्धन विभागाने त्याची दखल घेत महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला होता.

त्यानंतर आता पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदानावर सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांची कुक्‍कुटपालनाला पसंती आहे. वैयक्‍तिक तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करारावर हा व्यवसाय केला जातो.

अशा शेतकऱ्यांची संख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. मात्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून महावितरणद्वारे व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी होते. परिणामी उत्पादकता खर्चात वाढ होत आहे.

पशुसंवर्धन आयुक्‍त हेमंत वसेकर यांनी त्याची दखल घेत ‘महाऊर्जा’कडे पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदानावर सौर ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करण्यासंबंधीची मागणी पत्राव्दारे केली होती.

विदर्भात तापमान आणि उन्हाचे दिवसदेखील अधिक आहेत. या भागासाठी सौरऊर्जेचा पर्याय पूरक ठरणार आहे. आम्ही सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता. पशुसंवर्धन आयुक्‍तांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला. त्याच्या परिणामी आता ‘महाऊर्जा’कडून अनुदानावर सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
- शुभम महाले, सदस्य, राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT