Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : दोन दिवसानंतर थंडी परतण्याचे संकेत

ढगाळ आकाश, पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पहाटे थंडी कमी असून, दुपारच्या वेळी उकाडाही जाणवत आहे.

Team Agrowon

पुणे : ढगाळ आकाश, पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे (Foggy Weather) राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली आहे. राज्यात पहाटे थंडी (Cold Weather) कमी असून, दुपारच्या वेळी उकाडाही (Heat) जाणवत आहे.

आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर राज्यात थंडी परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशापाठोपाठ राज्यात आता दाट धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे.

सोमवारी (ता. ३०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली असून, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे.

बुधवारपर्यंत (ता. १) ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत येऊन नैर्ऋत्य दिशेकडे वळण्याचे संकेत आहेत. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी अधिक होत आहे.

सोमवारी (ता. ३०) बिहारच्या गया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३१) तामिळनाडू, केरळ राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६ (१४.९), जळगाव ३२.७ (१५.७), धुळे ३२.५ (११.४), कोल्हापूर ३०.९ (१८.१), महाबळेश्वर २६.४ (१४.१), नाशिक २९.७ (१५.८), निफाड २९.३ (९.५), सांगली ३०.९ (१७.३), सातारा ३१.१ (१५.०),

सोलापूर ३३.६ (१७.४), सांताक्रूझ ३०.० (२०.०), डहाणू २८.९ (१८.४), रत्नागिरी ३०.५(२१.३), औरंगाबाद २९.८ (११.८), नांदेड - (१७.२), उस्मानाबाद ३२.५ (१६.०), परभणी ३२.६(१५.८),

अकोला ३३.१ (१६.०), अमरावती ३२.० (१६.४), बुलढाणा ३२.४ (१८.०), ब्रह्मपूरी ३४.० (१७.५), चंद्रपूर ३१.६ (१७.२), गडचिरोली ३१.०(१४.८), गोंदिया ३२.२(१६.०), नागपूर ३१.८ (१५.७), वर्धा ३२.२(१६.४), यवतमाळ ३१.० (१६.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT