परभणी ः जिल्ह्यातील आमडापूर (ता. परभणी) येथील श्रीलक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याकडील (Shri Laxmi Nrusingh Sugar Factory) थकीत एफआरपी (Overdue FRP) अदा करावी. ऊस तोडणी (Sugarcane Harvesting) आणि वाहतूक खर्चाचे लेखा परिक्षण करावे आदी मागण्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे साखर आयुक्तांकडे (Sugar Commissioner) करण्यात आल्या.
लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्याने २०२१-२०२२ गाळप हंगामात १.२५ टक्के एवढा कमी साखर उतारा दाखवत शेतकऱ्यांचे प्रतिटन ३९२ रुपये कमी केले.
तर दुसरीकडे ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा प्रतिटन १३० रुपये एवढा वाढवून दाखविला.
दोन्ही मिळून प्रतिटन ५२२ रुपये कमी करून या कारखान्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.