Rabi Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Rabi season : कोल्हापुरात रब्बीसाठी ज्वारी बियाण्यांची टंचाई

अवकाळी पावसाने माघार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत.

Team Agrowon

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अवकाळी पावसाने माघार घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाचे (Rabi season) वेध लागले आहेत. परंतु ऐन हंगामात ज्वारी बियाण्यांची टंचाई असल्याचे चित्र आहे. महाबीजकडून आवश्यक त्या प्रमाणात बियाणांची आवक होत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.

खरिपातील सोयाबीन पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. १० ते १२ क्विंटल एकरी उत्पादनाची सरासरी असताना यावर्षी केवळ ४ ते ५ क्विंटल सोयाबीन पदरात पडले. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीकडे डोळे लावून बसले आहेत. तालुक्यात विशेषत: रब्बीमध्ये ज्वारी व हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

पावसामुळे अद्याप जमिनीचा वाफसा आलेला नाही. अगोप सोयाबीन कापणी झालेल्या क्षेत्रात ज्वारीची पेरणी सुरू झाली आहे. काही माळरानातील क्षेत्रात पेरणी पूर्णही झाली आहे. उशिरा सोयाबीन कापणी केलेल्या क्षेत्रात मात्र अद्याप वाफसा नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

दरम्यान, बाजारात सध्या ज्वारी बियाण्यांची टंचाई जाणवत आहे. जितका साठा होता तो संपल्याचे सांगण्यात येते. मागणी करूनही अद्याप कंपन्यांकडून ज्वारी आली नसल्याचे विक्रेत्यांतून सांगितले जात आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातूनही ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.

कृषी खात्याकडे अनुदानावर आलेल्या ज्वारीचेही वाटप पूर्ण झाले आहे. तरीही अद्याप लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने ज्वारी बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी खात्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy : देशात मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यासाठी २६ टक्के अधिकचा खतसाठा; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा

LPG Gas Price: एलपीजी दरवाढ तत्काळ रद्द करा

Food Preservation Technology: अन्नपदार्थ साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान

Shettale Yojana: शेततळे अनुदान, १७ हजार अर्ज रद्द, कारण काय?

Ammonium Sulphate Fertilizer: अमोनिअम सल्फेटचा फायदेशीर वापर

SCROLL FOR NEXT