Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांदा दरप्रश्नी पंढरपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून रास्ता रोको

कांद्याचे दर कोसळल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाली आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीमालाचे प्रंचड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे.

Team Agrowon

Onion Rate Issue कांद्याचे दर कोसळल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाली आहे. त्यातच अवकाळी (Unseasonal Rate) पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीमालाचे प्रंचड नुकसान (Crop Damage) झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे.

कांदा दर (Onion Rate) आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पंढरपूर कुर्डूवाडीरोडवरील आढीव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 'सरकार आहे मिंध्यांचे, वांदे झालेत कांद्याचे' अशा प्रकारच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या.

राज्यात गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पाकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांद्याच्या दराबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी करत विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.

राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त करणे हे या सरकारचे धोरण आहे.

हे शेतकरी विरोधी मिंधे सरकार शेतकऱ्यांसोबत घात करत आहे. या सरकारच्या विरोधात आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवु, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संजय घोडके म्हणाले.

युवासेनेचे नेते रणजित बागल यांनी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत दगाबाजी धोरण अवलंबल्याचा आरोप केला. तसेच कोणत्याही अटी शर्ती न ठेवता कांदा उत्पादकांना तत्काळ प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान थेट खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT