Raigad News : लाडक्या राजाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील शिवभक्तांनी मंगळवारी (ता.६) किल्ले रायगडावर हजेरी लावली. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. रायगडावर दिवसभर गर्दीचा महासागर उसळला. या गर्दीला नियंत्रित करणे प्रशासनाला कठीण गेले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी रायगडावर शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी आले. अत्यंत उत्साही, जल्लोषी वातावरणात युवराज संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्ण मूर्तीवर अभिषेक झाला. पालखी सोहळा , मर्दानी खेळ आदीमुळे वातावरण शिवमय झाले.
या वेळी आमदार रोहित पवार, आमदार अनिकेत तटकरे, स्नेहल जगताप यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या नियोजनातून समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत आणि सर्व सदस्यांनी नियोजन केले.
‘...ही तुमची ताकद’
संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक साजरा करताना पूर्वी हजार मावळे (स्वयंसेवक) होते. आज लाखो मावळे सोहळ्यास उपस्थित राहिले. याचा मोठा आनंद होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळा जगात पोहचावा या उद्देशाने हा सोहळा साजरा करण्यास प्रारंभ केला. त्याचे फलित चांगले होत आहे. ही तुमची ताकद आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.