Team Agrowon
किल्ले रायगडावर आज ६ जून रोजी तारखेनुसार ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली आहे.
गडावर शिवभक्तांची तोबा गर्दी झाल्याने गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे गडाखाली जवळपास ५० ते ७५ हजार लोक आहेत.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतीदेखील गडावर पोहोचले. त्यांनी शिवभक्तांशी संवाद साधत इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये,' असं आवाहन संभाजीराजे यांनी केले.
ढोल, हलगी, महिलांचे लेझिम अशा पारंपरिक वाद्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
रायगड किल्ल्यावर शिवरायांना मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कुऱ्हाडी, ढाल-तलवार, दांडपट्टा, भाला, चक्र, शूल, लाठी-काठी या खेळाची प्रात्यक्षिके दाखविली.
तसेच गडावर शाहिरांनी मानवंदना देण्यात आली. ‘उगवला तारा तिमिर हारा, गर्जा शिवाजी राजा…’, ‘रायगड किल्ला महाराष्ट्राची शान…’, ‘शिवरायांची तलवार…’, ‘दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती…’ आदी पोवाडे सादर केले.
लाखो शिवभक्तांच्या हस्ते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांना राज्याभिषेक घालण्यात आला. सोहळ्यात लेझर शो, शिवकालीन युध्दकला व मर्दानी खेळाने शिवभक्तांचे डोळ्यांचे पारणे फिटले.