Shegaon APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Shegaon APMC : शेगाव बाजार समितीचे रुपडे आता पालटणार

Maharashtra APMC : जिल्ह्यातील शेगाव हे ठिकाण संत गजानन महाराज मंदिरामुळे देशभर पोहोचले आहे. या ठिकाणी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे रुपडेही आता बदलणाच्या मार्गावर आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील शेगाव हे ठिकाण संत गजानन महाराज मंदिरामुळे देशभर पोहोचले आहे. या ठिकाणी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे रुपडेही आता बदलणाच्या मार्गावर आहे.

स्वारस्य अभियोक्ती योजनेअंतर्गत मुख्य बाजारात नवीन इमारतीसह व्यावसायिक गाळ्यांच्या बांधकामाला पणन महासंघाने मंजुरी दिली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत उभी राहणार असून, बाजार समितीच्या वैभवात भर पडणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात नियोजित २६ व्यावसायिक गाळ्यांचे संकुल बांधकाम करण्यासाठी पणन संचालकांनी १७ ऑगस्टला काढलेल्या आदेशानुसार मंजुरी दिली आहे. त्यानुसार समितीच्या मुख्य बाजार आवार जागेवर स्वारस्य अभियोक्ती योजनेअंतर्गत कार्यालयीन इमारतीसह २६ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात येईल.

शेतीपूरक व्यवसायाकरिता २९ वर्षांच्या कालावधीसाठी अनामत घेऊन लीज भाडेतत्त्वावर गाळे रजिस्टर कराराने मिळू शकतील. इच्छुक व्यावसायिकांकडून गाळे मागणीचे अर्ज ३० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत समितीद्वारे मागविण्यात आले आहेत.

नियम व अटी, तसेच अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी बाजार समितीमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. स्वारस्याची अभियोक्ती या शीर्षाखाली गाळे वाटप करण्याचे अथवा रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवल्याची माहिती सभापती गोपाळ मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे, सचिव विलास पुंडकर यांनी दिली.

शेगाव बाजार समिती शेतकऱ्याच्या हितासाठी कटिबद्ध असून, नवीन इमारत व दुकानामुळे विविध व्यवसायिकांना हातभार मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- पांडुरंग पाटील, सहकार नेते, शेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra : राज्यातील १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट; मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

Farmer Loan Waiver : कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी; सहकार मंत्र्यांकडून सावरासावर

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेत दुरुस्ती करु, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे विधानसभेत आश्वासन

Farmers Protest: शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Tur Variety Selection: तुरीचे वाण निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

SCROLL FOR NEXT