Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या प्रवृती उलथवून लावू ः शरद पवार

Team Agrowon

Maharashtra Politics News : महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले.

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका काही प्रवृत्तींनी घेतली, पण या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांनी रविवारी (ता. २) बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी (ता. ३) कऱ्हाड (जि. सातारा) येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते.

त्या वेळी ते बोलत होते. त्या दरम्यान राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार मकरंद पाटील, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की देशाचे ज्येष्ठ नेते, देशाच्या स्वातंत्र्यासाटी ज्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ झोकून दिला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या महाराष्ट्राची निर्मिती केली अशा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. जिल्ह्या-जिल्ह्यात तरुणांचा संच उभा केला.

त्या युवाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर कसा नेता येईल याची अखंड काळजी घेतली. आज यशवंतराव चव्हाण आपल्यात नसले तरी त्यांचा विचार तुमच्या-माझ्या अंतकरणात आहे, त्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली. महाराष्ट्रात आणि देशात काही जात-धर्म, पंथ यांचा आधार घेऊन माणसा-माणसात संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारे काही वर्ग आहेत.

महाराष्ट्र हे बंधुत्व, इमानदारी यांचा पुरस्कार करणारे राज्य आहे. मध्यंतरीच्या काळात याच महाराष्ट्रात शाहु महाराजांचे कोल्हापूर, नांदेड, संगमनेर, अकोला येथे पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जातीय दंगल झाली, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही पण या समाजविघातक प्रवृतींच्या विरोधात भक्कमपणाने आज उभे राहण्याची गरज आहे.

ते काम महाराष्ट्रात करत होतो. एक काळ असाही येऊन गेला की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपण सर्वांनी एकत्र केले. त्या सरकारमध्ये महाराष्ट्राची सेवा करत होतो, तेच सरकार या ना त्या पद्धतीने उलथवून टाकण्याचे काम काही लोकांनी केले.

हे महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक राज्यांत केले. मध्य प्रदेशचे राज्य गांधी-नेहरुंच्या विचाराने व्यवस्थित चालले होते. ते अशाच पद्धतीने उलथवण्यात आले आणि जातीय वृत्तीला प्रोत्साहन देणारे सरकार तेथे आणले. देशात अनेक ठिकाणी असे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या संकटाचा काळ आहे. चुकीच्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तीने चव्हाण साहेबांच्या, शाहु, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात लोकशाहीच्या पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न आणि त्यामागची भूमिका ही उघडपणे एकच आहे ती जातीय विचारधारा आहे. महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली.

मात्र फुले, शाहु, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस महाराष्ट्रातील सामूहिक शक्ती मजबुत केल्याशिवाय आणि ही शक्ती मजबुत करून उलथापालथ करणाऱ्या शक्ती, वर्ग यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

त्याला फार अवकाश नाही. वर्ष-सहा महिन्यांत पुन्हा एकदा लोकांसमोर जायची संधी येईल, त्यावेळेला या प्रवृत्ती पूर्णपणाने बाजूला करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रगतीच्या आणि सामान्य माणसांच्या हितासाठी कष्ट करणारे राज्य येईल ही अपेक्षा आपण करू, असे श्री. पवार म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण समाधीस्थळी पवारांसमवेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी कऱ्हाड (जि. सातारा) येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र राष्ट्रीय विचारधारा याचा विचार करूनच ते शरद पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT