ताज्या बातम्या

Water Shortage Marathwada : मराठवाड्यात तहानलेल्या गावांची संख्या ३८१ वर

Water Shortage News : मराठवाड्यात तहानलेल्या गावांची संख्या ३८१ असून, ४४७ विहिरींद्वारे या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यात तहानलेल्या गावांची संख्या ३८१ असून, ४४७ विहिरींद्वारे या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे हिंगोली जिल्ह्यात १४२, तर त्या खालोखाल ९३ गावे नांदेड जिल्ह्यात आहेत.

उन्हाळा सुरू झाला, की पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ काही जिल्ह्यांमध्ये काही भागात पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागत आहे.

मराठवाडा विभागात सध्या ३८१ गावांना ४४७ टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार आगामी जुलै, ऑगस्टपर्यंत विभागात १८१४ टँकरची आवश्यकता राहील, त्याची सुरुवात मे महिन्यापासून सुरू झाली आहे. सध्या जालना जिल्ह्यातील १० गावे आणि ४ वाड्यांना ११ टॅंकरने, तर हिंगोली जिल्ह्यातील ८ गावांना ११ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टंचाईमुळे सहा जिल्ह्यांमधील ४४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत मात्र एकाही विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही. मराठवाड्यात जून महिन्यानंतर मराठवाड्यातील तब्बल ५ हजार ३८६ गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावर उपाययोजना करण्यासाठी १०० कोटी ७३ लाख रुपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा शासनाला काही दिवसांपूर्वीच सादर करण्यात आला. यामध्ये विभागातील आठही जिल्ह्यांत प्रारंभी १ हजार ८१४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थिती अशी...

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८१ गावांसाठी ८५, जालना १२, हिंगोली १७७, नांदेड १०८, बीड ५४, तर लातूर जिल्ह्यात अधिग्रहीत केलेल्या ११ विहिरीचा समावेश आहे. यामध्ये २४ विहीरी या टँकरसाठी, तर ४२३ विहीरी या टँकर व्यतिरिक्त अधिग्रहित केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Status: पशुसंवर्धन व्यवसायाला प्राप्तिकरातून सूट मिळणार?

Maharashtra Rain Alert: राज्यात जोरदार पावसाचा इशारा

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT