Water Shortage News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याला तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. गेल्या वर्षी जास्त पाऊस होऊनही यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून यंदा नवीन गावपाड्यांची भर पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. आजमितीस तालुक्यातील तब्बल १६३ गावपाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील सावरोली, खैरे, शीळ, विठ्ठलगाव, निचितपाडा, साईनगर (बिरवाडी), घरतपाडा, भोईरपाडा, कातकरीवाडी अशा अनेक नवीन गावपाड्यांची टंचाईमध्ये भर पडली आहे. लोकसंख्येनुसार एकदिवसा आड किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वाट पाहावी लागत आहे.
आंबेखोर, मानखिंड, वांद्रे, पिंपळपाडा, जांभुळवाड, चिंचपाडा, धुपारवाडी, वाघवाडी, गावंडवाडी, मठवाडी, तईचीवाडी अशा १६३ गावपाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दहा गावपाड्यांसाठी दोन टँकरची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे. तालुक्यातील तब्बल १६३ गावपाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दहा गावपाड्यांसाठी दोन टँकरची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
टँकर सुरू न झाल्याने पायपीट
माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आवाळे ग्रामपंचायतीमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट कोसळले असून विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलचे स्रोत आटले आहे. यामुळे येथील २२ गाव पाड्यांना टंचाईला सामोरे जावे लागत आहेत.
येथील दहापैकी सहा विहिरी आटल्या असून चार विहिरींनी तळ गाठला आहे तर ४० पैकी अवघ्या चार बोअरवेलला थोड्याप्रमाणात पाणी असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
या टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू न झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे येथील सरपंच लहू पाचलकर व उपसरपंच प्रदीप आगीवले यांनी सांगितले.
बोअरिंग दुरुस्तीसाठीदेखील वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या खेट्या माराव्या लागत असल्याचे आगीवले यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.