Water Shortage : धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी; टंचाई वाढण्याची स्थिती

Jalgaon Water Issue : जळगाव जिल्ह्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अतितापमानामुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातसदृश तापाने मृत्यू झाला आहे.
Water Shortage
Water ShortageAagrowon

Jalgaon Water News : जळगाव जिल्ह्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अतितापमानामुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातसदृश तापाने मृत्यू झाला आहे. ‘एल निनो’मुळे तापमानात वाढ होत असून, अतितापमानाचा अनेक बाबींवर दुष्परिणाम होत आहे.

अतितापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन तीव्र गतीने होत असून, पाणीसाठ्यात घट होत आहे. वाघूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल.

वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे.

धरणांमध्ये ४४ टक्के साठा

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणा धरणात ३८.५८ टक्के साठा होता. यंदा मात्र त्यात घट झाल्याने तो आता २७.६८ टक्के झाला आहे.

Water Shortage
Water Shortage : जलविम्याद्वारे करू दुष्काळावर मात

१४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जामनेरमध्ये मोरगाव, रोटवद, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवडमध्ये एनगाव एक टँकर, पारोळामध्ये हनुमंतखेडा, खेडीढोक येथे दोन टँकर, चाळीसगावमध्ये मौजे पिंपळगाव येथे दोन टँकर, भुसावळ तालुक्यातील कंडारी, कुऱ्हे प्र.न. दोन टँकर, पाचोरा तालुक्यातील रामेश्‍वर आणि लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १४ गावांत १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

धरणातील साठा असा...

धरणाचे नाव - टक्के पाणी

हतनूर - ५३.८२

वाघूर - ६८.१०

मन्याड - १५.३०

भोकरबारी - २.०७

सुकी - ६४.५४

अभोरा - ६४.७३

अग्नावती - ६.६०

तोंडापूर - ४४.१७

हिवरा - १२.५७

मंगरूळ - ४८.३५

बहुळा - २४.८१

मोर - ६७.४९

अंजनी - २५.४९

गूळ - ६७.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com