Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी अतिवृष्टी झाली आहे. रायगड, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, बीड जिल्हयात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर लातूर, हिंगोली, परभणी, अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे..पुणे जिल्ह्यात ५५ मंडळात अतिवृष्टी झाली. पुण्यातील उरूळीकांचन मंडळात सर्वाधिक १४२ मिमी पावसाची नोंद झाली..रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनेवल तालुक्यातील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेन तालुक्यातील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यातील माणगाव, इंदपूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली आहे..Maharashtra Monsoon Rain: राज्यात आणखी २ दिवस मुसळधारेचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर, कोंडवी, वाकण, मुरुड तालुक्यातील बोरली, म्हसळा तालुक्यातील खामगाव मंडळात अतिवृष्टी झाली आहे.तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेडशी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे..नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, निघोज आणि पालवे खुर्द, तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी, पेडगाव, चिंभळे, देवदैठण, कोळेगाव, लोणी व्यंकनाथ, भानगाव, अढळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. कर्जत तालुक्यातील राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, खेडमध्ये तर पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, मणिकदौंडी, तिसगाव येथे अतिवृष्टी झाली..Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट.पुणे जिल्ह्यातील पुणे शहर तालुक्यातील शहर, केशवनगर, हवेली तालुक्यातील कोथरुड, खडकवासला, थ्यूर, उरळीकांचन, भोसरी, कळस, वाघोली, अस्थापूर, मुळशी पौड तालुक्यातील थेरगाव, खेड राजगुरुनगर तालुक्यातील आळंदी, शिरुर घोडनंदी तालुक्यातील वडगाव, न्हावरा, तळेगाव, कोरेगाव, शिरुर, निमोणे येथील मंडळात अतिवृष्टी झाली. बारामती तालुक्यातील बारामती, मालेगाव, पंडारे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंदवाडी, शिरसुफळ, इंदापूर तालुक्यातील भिगवन, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अथुर्णी, सनासर, पळसदेव, लाखेवाडी, दौंड तालुक्यातील देऊळगाव, येवत, खेडगाव, राहू, रावणगाव आणि दौंड, बोरी भडक, खामगाव, वडेगाव बांडे, पारगाव, बोरी पारधी, गिरीम, कुरकुंभ, पुरंदर सासवड येथील जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा, शिवरी मंडळात अतिवृष्टी झाली..सोलापूर जिल्ह्यातील बोरमनी, मुटसी, बार्शी तालुक्यातील वैराग, गौड़गांव, अक्कलकोटमधील मैंदर्गी, मोहोळ तालुकत्यातील सावळेश्वर, मोहोळ, माढामधील कुर्डुवाडी, रोपळे, महिसगाव, रांजणी, कर्माळा तालुक्यातील केम, जेऊर, सालसे, कोर्टी, उमरड, केतूर मंडळात तर सातारा जिल्ह्यातील खटाव वडूजमधील खटाव, पुसेगाव, बुध, फलटणमधील फलटण, आसू, होळ, वाठार, तारदगाव, कोळकी, खंडाळा तालुक्यातील वाठार, लोणंद मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली..बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील नालवंडी, नेकनूर, यळंबघाट, अष्टी तालुक्यातील कडा, टाकळसिंगा, दावलावडगाव अतिवृष्टी झाली आहे..पुण्यातील खडकवासलासह इतर काही धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.