Dairy Agrowon
ताज्या बातम्या

Dairy Industry : मिल्कोमीटर, वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारा

Team Agrowon

औरंगाबाद ः फॅट व ‘एसएनएफ’ मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमीटर (Milk Meter) यंत्रामध्ये व दूध प्रमाण (Milk) मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काट्यांमध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची राज्यभर लूटमार (Farmer's Loot) सुरू आहे. मिल्कोमीटर यंत्रांच्या प्रमाणीकरणाची कोणतीही शासकीय यंत्रणा राज्यात कार्यरत नाही.

दूध संकलन केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नसल्याने चुकीची मापे दाखवूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मिल्कोमीटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी दुग्ध विकास विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.

समितीने याबाबत दुग्ध विकास विभागाला वारंवार निवेदने दिली आहेत. दुग्ध विकास मंत्री व दूध आयुक्त यांनाही निवेदने देऊन या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र राज्याचा दुग्ध विकास विभाग संपूर्णपणे निष्क्रीय असल्याने याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

दुधाचे दर, फॅट व ‘एसएनएफ’नुसार ठरत असतात. फॅट व ‘एसएनएफ’मध्ये थोडा जरी बदल झाला तरी दूध उत्पादकाला मोठा तोटा होतो. वजन मापनातील फरकामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

सुस्त दुग्ध विकास विभाग या लुटमारी विरोधात काहीच करणार नसेल तर शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा समिताच्या वतीने देण्यात आला आहे.

दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व राज्यात तातडीने दुग्ध विकास विभागाची स्वतंत्र मिल्कोमीटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लूट थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, सतीश देशमुख, जोतिराम जाधव, श्रीकांत कारे, प्रा. अशोक ढगे, दादा गाढवे, दीपक पानसरे, दीपक वाळे, रामनाथ वदक, मंगेश कान्होरे, राजकुमार जोरी, नंदू रोकडे, सीताराम पानसरे, अमोल गोर्डे, सूर्यकांत कानगुडे, सुदेश इंगळे, सुहास रंधे, दादा कुंजीर, इंद्रजित जाधव, अविनाश जाधव आदींनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT