Dairy Business :दुग्ध व्यवसायाला शाश्‍वत स्थिरता देणारा प्रकल्प घडावा

पश्‍चिम भारत व महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी दूध संघानी एकत्र येऊन तीनदिवसीय इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.
Satej Patil
Satej PatilAgrowon

कोल्हापूर : ‘‘दूध व्यवसायाला (Dairy Business) सध्या भेडसावणाऱ्या अडचणी, भविष्य काळातील संकटे यावर मात करत दुग्ध व्यवसायाला (Dairy Industry) शाश्‍वत आणि स्थिरता प्रदान करणारा दिशादर्शक प्रकल्प दूध परिषदेमधून घडावा,’’ असे मत माजी मंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी येथे व्यक्त केले.

Satej Patil
Indian Dairy Festival : कोल्हापुरात शुक्रवारपासून इंडियन डेअरी फेस्टिव्‍हल

पश्‍चिम भारत व महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी दूध संघानी एकत्र येऊन तीनदिवसीय इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत येथे शुक्रवारी (ता.२०) सकाळी दूध परिषद झाली. या परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलताना श्री. पाटील बोलत होते.

Satej Patil
Mother Dairy : मदर डेअरीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ

फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजक व गोकुळचे संचालक चेतन नरके म्हणाले, ‘‘इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे आयोजित दूध परिषद ही व्यवसायिकांची वारी बनावी. नवीन तंत्रज्ञान अत्याधुनिक सेवा सुविधा या बळावर नव्याने श्‍वेतक्रांती घडविण्याची वेळ आहे.’’

चितळे डेअरी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक विश्‍वास चितळे यांनी आभार मानले. व्यासपीठावर ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, कात्रज दूर संघाच्या केशर पवार, वारणा दूध संघाचे एच. आर. जाधव, सहकार आणि पणन विभागाचे प्रमुख सचिव अनुप कुमार, प्रभात डेअरीचे राजू मित्रा एनडीडीबीचे निरंजन कराडे, गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले, यळगुड दूध संस्थेचे सुजितसिंह मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. महेंद्र कुलकर्णी व शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com