Agri Banking : जळगाव खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे १२०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे आहे. रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. यात ओल्या दुष्काळासंबंधीच्या सवलती, आदेश शासनाने लागू केलेल्या असताना देखील बँकांची पीककर्ज वसुली सुरूच असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांत आहेत. .राष्ट्रीयीकृत बँका मनमानी करीत आहेत. सुरुवातीपासून या बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीककर्जाचे प्रस्ताव घेवून बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत..Paddy Crop Fire : ६ एकर भातपीक आगीत खाक! बोगस बियाण्यांमुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल.जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी २० कोटींवर पीक कर्ज वितरण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वितरण ऑक्टोबरच्या महिन्यातच सुरू झाल्याची माहिती मिळाली. यातच जशी वसुली होईल, तसे पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँका करतील. वसुली सुरू आहे. वसुलीनंतर लागलीच पीक कर्ज नूतनीकरण केले जाते. पण जे शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाहीत, त्यांना बँका नोटिसा देणे, तोंडी सूचना देऊन पीककर्ज मागत आहेत..Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू.थकबाकीदार, कर्जदार शेतकरी अनेकअनेक शेतकरी जळगाव जिल्ह्यात थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडून पीककर्ज वसुलीचा तगादा बँका मार्च महिन्यापासून लावत आहेत. काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज यंदा थकल्याने नवे कर्ज मिळू शकत नाही..पीककर्ज वितरण रखडतजळगाव जिल्ह्यात सुमारे ९०० कोटी, धुळ्यात १५० आणि नंदुरबारात ११० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीक कर्ज फक्त ६० टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्चित करते, परंतु बँकांना पीककर्ज निधीची व्यवस्था करावी लागते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.