E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : ई-पीक नोंदणीसाठी ‘सर्व्हर डाउन’चा खोडा

Kharif Crop : ई-पीक नोंदणी करण्यासाठी असलेल्या मोबाइल ॲप २.० व्हर्सन‌ खूप स्लो (हळू) चालत आहे.

Team Agrowon

Parbhani News : ई-पीक नोंदणी करण्यासाठी असलेल्या मोबाइल ॲप २.० व्हर्सन‌ खूप स्लो (हळू) चालत आहे. दुर्गम भागात मोबाइल टॉवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित मिळत नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे उर्वरित शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य झाले आहे. अनेक शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध पीकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी (रियल टाइम डाटा) उपलब्ध व्हावा. त्यानुसार शासनास धोरणे ठरविता यावीत. त्यासाठी ई-पीकनोंदणी प्रकल्प राबविला जात आहे. परंतु कृषी, महसूल, ग्राम विकास विभागातर्फे पुरेशी जागृती केली नाही. ई-पीक ॲपमध्ये विविध सलग तसेच मिश्र पिकांची नोंद करण्याविषयी शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी‌चा अभाव, तसेच सर्व्हर डाउनमुळे अडचणी वाढल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. ११) पर्यंत ५ लाख ४६ हजार ६५९ पैकी २ लाख ७२ हजार ७०१ शेतकरी खातेदारांनी (४९.८९ टक्के) एकूण ३ लाख ५० हजार ४७० हेक्टर (५७.६७ टक्के) क्षेत्रावरील पिकांची ई-नोंदणी केली होती. यंदाच्या पेरणीपैकी १ लाख ५५ हजार ७०७ हेक्टरवरील पिकांची व एकूण शेतकरी खातेदारांपैकी २ लाख ७३ हजार ९५८ शेतकऱ्यांनी ई-पीकनोंदणी करणे बाकी होते.

हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार ६७४ पैकी ८४ हजार ८९३ शेतकरी खातेदारांनी (२४.२८ टक्के) तर एकूण शेती क्षेत्र ४ लाख ५१ हजार ५६९ पैकी १ लाख ७ हजार ४५३ हेक्टर (२५.२६ टक्के) क्षेत्राची ई-पीकनोंदणी झाली आहे.

ॲप स्लो चालत असल्यामुळे ई-पीकपाहणी प्रक्रिया वेगाने होत नाही. आजवर झरी (ता. परभणी) येथील २ हजार ७२० पैकी २७ टक्के खातेदारांनी ई-पीकपाहणी केली आहे. तलाठी स्तरावरील ई-पीकपेरा नोंदीस मंजुरी देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, असे तलाठी किरण चव्हाण यांनी सांगितले.

ई-पीक नोंदणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १२) दिवसभरात अनेक वेळा प्रयत्न करूनही ॲप पुढे चालत नसल्यामुळे, शेतातील उभ्या पिकांचे फोटो अपलोड करण्यासाठी ई-पीक नोंदणी पूर्ण करता आली नाही. पीकविमा तसेच इतरही अनेक बाबींसाठी सातबारावर अद्ययावत पीकपेऱ्याची नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीकपाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे ई-पीकनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी.
- नरेश शिंदे, सनपुरी, जि. परभणी
यंदा ई-पीक नोंदणीसाठी सुरुवातीपासून अडचणी येत आहे ॲपमध्येच बंद पडत आहे. त्यामुळे अडथळे येत आहेत. दिवसभर ॲप चालत नसल्यामुळे सकाळ संध्याकाळच्या वेळी ई-पीकनोंदणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांना ई-पीकनोंदणी बाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मंगळवार (ता. १२) आमच्या गावातील ४६० पैकी १५० शेतकऱ्यांनी ई-पीकनोंदणी केली होती. ॲप व्यवस्थित चालत नसल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीकनोंदणी विहित मुदतीत पूर्ण होणे अशक्य दिसत आहे.
- शंकर गुट्टे, बेलुरा, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT