Dr. J. F. Patel Agrowon
ताज्या बातम्या

Dr. J. F. Patil : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व प्रा. डॉ. जयकुमार फाजगौंडा ऊर्फ जे. एफ. पाटील (वय ८२) यांचे बुधवारी (ता. ७) येथे सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर, ः शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) अर्थशास्त्र (Economics) विभागाचे माजी प्रमुख ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व प्रा. डॉ. जयकुमार फाजगौंडा ऊर्फ जे. एफ. पाटील (Dr. J. F. Patil) (वय ८२) यांचे बुधवारी (ता. ७) येथे सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले.

शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांना शनिवारी (ता. ३) रुग्णालयात दाखल केले होते. अभ्यासू आणि सामाजिक जाणिवेतून आर्थिक प्रश्नांची मांडणी करणारे अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. जे. एफ. पाटील १९८२ मध्ये शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात रुजू झाले. विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ते शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र परिषद, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व संयोजक म्हणूनही काम पाहिले.

शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे ते पहिले संचालक होते. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांना रा. ना. गोडबोले युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यासनावर प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

त्यांनी आजपर्यंत १०० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. ‘अर्थशास्त्रीय संशोधनाची तोंडओळख’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ पथदर्शी मानला जातो. डॉ. पाटील यांनी ‘ॲग्रोवन’मध्येही कृषी अर्थशास्त्र या विषयावर लिखाण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate: कृषी कर्ज मिळणार; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु, कसा अर्ज करावा?

Return Monsoon Rain: सप्टेंबरच्या शेवटी जोरदार पाऊस पडेल का ?

Pomegranate Training: सोलापुरात डाळिंब लागवड, मूल्यसाखळीवर विशेष प्रशिक्षण

Devendra Fadanvis : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले?

Farmers' Protest: परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुष्काळ मोर्चा

SCROLL FOR NEXT