Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकितप्रकरणी चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Sugar Commissioner : राज्यातील ८६ साखर कारखान्यांकडील ८१७ कोटी रुपयांच्या थकित एफआरपीप्रकरणी साखर आयुक्तांनी या साखर कारखान्यांना नोटिसा पाठवून त्यांची गेल्या आठवड्यात सुनावणी घेतली होती

Team Agrowon

Solapur News : गाळप हंगाम २०२३-२४ मधील शेतकऱ्यांच्या उसाची ‘एफआरपी’ थकित ठेवल्याप्रकरणी राज्यातील चार साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटच्या मातोश्री शुगर कारखान्याचा समावेश आहे.

राज्यातील ८६ साखर कारखान्यांकडील ८१७ कोटी रुपयांच्या थकित एफआरपीप्रकरणी साखर आयुक्तांनी या साखर कारखान्यांना नोटिसा पाठवून त्यांची गेल्या आठवड्यात सुनावणी घेतली होती.

नोटिसा मिळाल्यावर २१ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२५ कोटी रुपये एफआरपीची रक्कम जमा केली. त्यामुळे शंभर टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या १४६ झाली आहे.

राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह ३४ हजार ८४० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत. चार कारखान्यांकडे मिळून ३७.१८ कोटी रुपये थकित एफआरपी असल्याने त्यांच्यावर आरआरसी झाली आहे.

आता त्याबाबतची लवकरच कारवाई होणार आहे. उर्वरित ६५ कारखान्यांकडून ६९२ कोटी रुपये एफआरपी देणे बाकी असल्याचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी सांगितले.

आरआरसी आदेश निर्गमित झालेले कारखाने व रक्कम

साजन शुगर, जि. अहमदनगर-२.४६ कोटी

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, जि. पुणे - १५.७७ कोटी

मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, जि. सोलापूर-११.५४ कोटी

टोकाई सहकारी साखर कारखाना, जि. हिंगोली-७.४१ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update: थंडीचा कडाका कायम राहणार; राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरु

Water Projects: पाडळसे, बलून बंधाऱ्यांना निधी केव्हा?

Agri Value Chain: शेतकरी, ग्राहकांशी जोडून घेणे गरजेचे

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीला बुधवारी मिळणार नवा सभापती

Livestock Feed: सकस चाऱ्यासाठी ओट

SCROLL FOR NEXT