Swabhimani Shetkari Sanghtna Agrowon
ताज्या बातम्या

Swabhimani Shetkari Sanghtna : ‘स्वाभिमानी’च्या गस्त पथकाकडून आले जप्त

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकरी यांच्या भरारी पथकाने खटाव तालुक्यातील नेर धरण, ललगुण, कोरेगाव तालुक्यातील भाडळे, विखळे आणि जाधववाडी परिसरात धाडी टाकल्या.

टीम ॲग्रोवन

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghtna) आणि आले उत्पादक शेतकरी यांच्या भरारी पथकाने खटाव तालुक्यातील नेर धरण, ललगुण, कोरेगाव तालुक्यातील भाडळे, विखळे आणि जाधववाडी परिसरात धाडी टाकल्या. या वेळी नवे-जुने आले वेगळे करून बाजारपेठेत पाठविणाऱ्या व्यापारी सत्यवान ढाणे (Satywan Dhale) या व्यापाऱ्याचा माल जप्त केला.

येथे साधारण ५० प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून संघटनेने आंदोलन आणखी तीव्र केले आहे.आले नवे-जुने न करता एकत्रित खरेदी करावी या आंदोलनाला बहुतांशी व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत एकत्रित आले खरेदी सुरू केली आहे. मात्र अजूनही काही जण मनमानी करत वेगवेगळी खरेदी करत आहे.

या पद्धतीने खरेदी थांबविण्यासाठी स्वाभिमानीची गस्त पथके कार्यरत आहेत. आले काढणी व धुणीच्या प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहेत. जाधववाडी येथे भर पावसात जाऊन संघटनेने हे आंदोलन केले. विभागणी करून खरेदी करणारा एखादा व्यापारी सापडला, तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा दिला आहे.

या आंदोलनात भरारी पथकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, तालुकाध्यक्ष खटाव दत्तुकाका घार्गे, किरण सावकार पाटील, सचिन घोरपडे, वनराज फाळके, निवृत्ती बोरकर, प्रेमनाथ खामकर सहभागी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT