Sugarcane Conference Agrowon
ताज्या बातम्या

Sugaracane Conference : ‘ऊस परिषदे’तून शास्त्रशुद्ध शेतीचा जागर व्हावा

ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी येथून पुढील काळात तांत्रिक बदल अत्यावश्यकच आहेत.

Team Agrowon

Kolhapur News ऊस उत्पादकता (Sugarcane Productivity) वाढवण्यासाठी येथून पुढील काळात तांत्रिक बदल अत्यावश्यकच आहेत. परिषदेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध शेतीचा (Scientific Agriculture) जागर व्हावा व तो राज्यभर जावा, अशी अपेक्षा माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने बामणी (ता. कागल) येथे आयोजित राज्यस्तरीय ‘ऊस विकास परिषदे’च्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव ऊर्फ भैय्या माने, कागल तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरुंबे, भारत ॲग्रो सर्व्हिसेसचे अध्यक्ष सत्यजित भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने-पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष किरण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कृषिभूषण संजीव माने, डॉ. अरुण मराठे, शामकांत पाटील, उत्तमराव परीट आदींनी मार्गदर्शन केले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतिशील ऊस उत्पादकांना ऊसभूषण कार्यगौरव, महाराष्ट्र ऊस विकास कार्यगौरव आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यात ‘ॲग्रोवन’चे कोल्हापूर प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांना ‘ आदर्श कृषी पत्रकार कार्यगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Price Hike: दुग्धोत्पादनाच्या तेजीचे वास्तव

Water Conservation Works: जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार; जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांचे नियोजन

Banana Farmer Issue: केळीच्या नुकसानीचे परतावे विमाधारकांना अप्राप्तच ४०० कोटी मंजूर, पण फक्त निम्माच निधी वितरित

Turmeric Crop Crisis: हळद पीक संकटात; टँकरने सिंचनाची वेळ; रिसोड तालुक्यात १० हजार हेक्टरवरील लागवडीला पाणीटंचाईचा फटका

Drought Protest: दुष्काळ संघर्ष यात्रा दडपण्याचा प्रयत्न; तुपकर : ४ डिसेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा

SCROLL FOR NEXT