Paddy Production
Paddy Production Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Rate : कवडीमोल दराने भाताची विक्री

Team Agrowon

खर्डी : शहापूर तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाने (Tribal Development Board) शेतकऱ्यांकडून भात खरेदी (Paddy Procurement) करण्यासाठी १० नोव्हेंपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आवाहन केले होते; परंतु शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून २० दिवस झाले तरी आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले भात कवडीमोल भावात खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालावे लागत आहे.

भात खरेदी करण्यास आदिवासी विकास महामंडळ दिरंगाई करीत असल्याने नाईलाजाने शेतकरी आपली आर्थिक अडचण सोडवण्यासाठी भात व्यापाऱ्यांना विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

काही प्रमाणात सुस्थितीत शिल्लक राहिलेल्या भातपिकाला आदिवासी विकास महामंडळाने २०४० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करून दीड महिना झाला आहे व १५६०२ शेतकऱ्यांनी महामंडळाकडे भात विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून २० दिवस उलटले; परंतु महामंडळ भात खरेदी केंद्र सुरू करीत नसल्याने खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने भात खरेदी करीत असल्याचे तालुक्यातील १० मंजूर खरेदी केंद्राच्या परिसरात निदर्शनास येत आहे.

नोंदणी पुरेशी झाली नसल्याने भात विक्रीसाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ७ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे पत्र दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही भात खरेदी सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांचे भात कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्याला विकावे लागत आहे. त्यामुळे महामंडळाने भात खरेदी केंद्र लवकर सुरू करावे.

- रामकृष्ण भेरे, शाखाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), बिरवाडी

शहापूर तालुक्यात १५ हजारांवर शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम सुरू असून, भात खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येतील. तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवून आपले भात स्वस्तात विकू नये.

- अविनाश राठोड, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, शहापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT