Salam Kisan Agrowon
ताज्या बातम्या

Salam Kisan: `सलाम किसान`चा बीड येथे कृषी प्रशिक्षण व रोजगार निर्मिती कार्यक्रम

Employment Generation : सलाम किसान समूहाने कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी काम सुरू केले आहे.

Team Agrowon

Salam Kisan : सलाम किसान समूहाने कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि `सलाम किसान (मुंबई)` यांच्या वतीने संयुक्तपणे बीड येथे कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण व रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बीड येथील सौ. के.वी.के.(काकू) कृषी व अन्नतंत्र महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

बीड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. `आत्मा`चे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, अनंत कृषी प्रतिष्ठानचे सहसचिव गोविंद साळुंके, सौ. के.वी.के.(काकू) कृषी व अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

यावेळी आत्मा कार्यालयातील जुबेर पठाण, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातील राहुल दळवी, सलाम किसानच्या अॅग्रिकल्चर असिस्टंट स्मिता सावंत, डिजिटल मीडिया अँड मार्केटिंग मॅनेजर सुमित मुंगले, ड्रोन मार्गदर्शक साहिल खेळकर उपस्थित होते.

सलाम किसान समुहाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल अध्यक्ष व इतर मान्यवरांनी कौतुकोद्गार काढले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सलाम किसानच्या टीमने कंपनीचे मिशन व व्हिजन या बद्दल माहिती दिली.

सलाम किसान कंपनीची स्थापना करण्यामागे संस्थापक कु. धनश्री मानधनी यांचा काय दृष्टिकोन होता, याविषयी सांगण्यात आले. त्यानंतर सलाम किसानच्या विविध उपक्रम व सेवांची माहिती देण्यात आली, आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती कशी फायदेशीर ठरू शकते, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर कृषी महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेल्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांची MCQ टाईप लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३० मुलांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली.

या मुलाखतीतून निवडण्यात आलेल्या मुलांना पुढील फेरीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक आणि त्याविषयीची प्रश्नोत्तरे. कार्यक्रमाला विद्यार्थी, तरूणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT