Salam Kisan : पवनी शहरात मोफत माती परीक्षण आणि ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व माहिती होणार आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

श्री हनुमान जयंती उत्सव समिती, बेलघाटा वार्ड, पवनी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पवनी अणि सलाम किसान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रम ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपार २ पर्यंत, श्री संताजी सभागृह बेलघाटा वॉर्ड, पवनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे.

सदर कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बंधु-भगिनीना निमंत्रित केले आहे. विकसित शेतकरी बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवण्याने शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व माहिती होणार आहे.

IIT कानपुरने बनविलेल्या तंत्रज्ञान मार्फत अगदी ९० सेकंदात माती परीक्षण, ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक व इतर सलाम किसान समूहाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सेवा या ठिकाणी बघायला मिळणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्रजी भोंडेकर तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पवनी येथील शेतकरी विलासभाऊ काटेखाये असणार आहेत.

तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरद क्रॉप सायन्सचे महाराष्ट्र हेड मुरलीधरजी उत्तरवार यांच्या द्वारे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळणार आहे.

त्याचबरोबर मा.श्री. परेशजी कुल्लरकर, ऍग्री ऑपरेशन मॅनेजर, मा. श्री. सुमितजी मुंगले, डिजिटल मीडिया मॅनेजर, ASM मा. श्री. महेशजी गुडधे व मा. श्री. श्यामजी पाटील, फील्ड ऑफिसर मा. श्री. कृष्णाजी शिंदे व वैभव दरवाई , तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. राजेशजी तलमले,अध्यक्ष, हनुमान जयंती उत्सव समिती, पवनी. मा. सौ. रजनीताई मोटघरे, अध्यक्ष, विविध सेवा सहकारी संस्था (पवनी) मा. श्री. प्रशांतजी मानापुरे, उपाध्यक्ष, विविध सेवा सहकारी संस्था (पवनी), मा.श्री. आदित्यजी घोगरे, तालुका कृषी अधिकारी (पवनी), मा. श्री. भूषणजी देशमुख, अध्यक्ष, कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी, मा. श्री. ज्ञानेश्वर देशमुख अध्यक्ष, श्री संताजी सभागृह बेलघाटा वार्ड (पवनी), मा. श्री. नामदेव सुरकर सचिव, श्री संताजी सभागृह बेलघाटा वार्ड, (पवनी) मा. श्री. वसंतजी तलमले सर (प्रमुख पाहुणे) मा. श्री. हरीशजी तलमले (प्रमुख पाहुणे) इत्यादींची उपस्थिती असणार आहे.

Salam Kisan
Salam Kisan: वरद व सलाम किसानच्या स्टॉलला कृषिमंत्री सत्तार यांची भेट

त्यामुळे परिसरातील केवळ पुरुष शेतकऱ्यांनीच नव्हे तर महिला शेतकरी वर्गानेही सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमास हजेरी लावून कृषी ज्ञानाचा आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या माहिती घ्यावी, असे आवाहन व श्री हनुमान जयंती उत्सव समिती बेलगाटा वार्ड, पवनी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पवनी व सलाम किसान (मुंबई) समूह यांच्याकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com