Agriculture Mechanization Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Mechanization : ‘कृषी यांत्रिकीकरण’मधून ६४३ कोटी रुपयांचा खर्च

Agricultural Mechanization Scheme : नगर जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेतून शेती अवजारे, साहित्य खरेदीसाठी अनुदान मागणी पूर्वीपासूनच अधिक आहे.

Team Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर (Tractor) टिलरसह (Tiller) विविध शेतीची अवजारे, शेतीपूरक व्यवसायाचे साहित्य मिळावे, यासाठी ‘कृषी यांत्रिकीकरण’ (Agricultural Mechanization Scheme) योजना राबवली जाते.

या योजनेतून राज्यात वर्षभरात सुमारे ६४३ कोटी १४ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात नगर जिल्हा शेतकऱ्यांना अनुदान देत सर्वाधिक रक्कम खर्च करण्यात अव्वल आहे.

कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना व कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जात आहे. ‘महाडीबीटी’ पोर्टलवर आता एकाच अर्जात सर्व योजनांचा लाभ मिळत आहे.

२०२२-२३ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानसाठी २०१ कोटी ४९ लाख, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २६२ कोटी २५ लाख व राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणसाठी १९३ कोटी ४१ लाख रुपये प्राप्त झाले होते.

त्यातील कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी ६५७ कोटी १७ लाख रुपये प्राप्त झाले होते. २०२१-२२ वर्षातील २० कोटी १४ लाख रुपये शिल्लक असल्याने ६७७ कोटी ३२ लाख रुपये तिन्ही योजनांसाठी उपलब्ध झाले होते.

दरम्यान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून १९६ कोटी ८८ लाख, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून २६५ कोटी ६८ लाख, कृषिविकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणातून १८० कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले आहेत.

तिन्ही योजनांतील खर्चात नगर, नाशिक, पुणे, सोलापूर अनुक्रमे तर उद्दिष्टाच्या टक्केवारीत रायगड, सातारा, यवतमाळ अव्वल आहे.

राष्ट्रीय कृषी उपअभियानात नऊ जिल्हे पुढे

राष्ट्रीय कृषी उपअभियान योजनेतील खर्चात नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ हे नऊ जिल्हे अग्रेसर आहेत. रायगड जिल्हा तीनही योजनांच्या खर्चात पुढे आहे.

जिल्हानिहाय झालेला खर्च (कंसात टक्केवारी)
ठाणे ः २ कोटी ४० लाख ६२ हजार (९६), पालघर ः तीन कोटी ३० लाख १६ हजार (९७), रायगड ः ३ कोटी ४७ लाख ५२ हजार (१०३), रत्नागिरी ः ५ कोटी ७ लाख १४ हजार (९४) सिंधुदुर्ग ः ६ कोटी ७२ लाख ५४ हजार (९१), नाशिक ः ४९ कोटी ५१ लाख (९७), धुळे ः १० कोटी ७८ लाख १९ हजार (९७), नंदुरबार ः १५ कोटी ७९ लाख १६ हजार (९९), जळगाव ः ३१ कोटी ४५ लाख ७१ हजार (९९), नगर ः ५६ कोटी ३ लाख ८५ हजार (९८), पुणे ः ४५ कोटी ९५ लाख (९७), सोलापूर ः ४७ कोटी १० लाख ५५ हजार (९६), सातारा ः ३२ कोटी ७० लाख

(१००), सांगली ः ३२ कोटी ७४ लाख ४४ हजार (८६), कोल्हापूर ः २१ कोटी ६८ लाख ४६ हजार (८८), औरंगाबाद ः २९ कोटी ९६ लाख १३ हजार (९७), जालना ः १२ कोटी १७ लाख १८ हजार (८८), बीड ः १७ कोटी ६२ लाख ७६ हजार (८६), लातूर ः १४ कोटी १२ लाख २७ हजार (८९), उस्मानाबाद ः १७ कोटी ०८ लाख ७७ हजार (९४) , नांदेड ः १३ कोटी ५८ लाख ४० हजार (९३), परभणी ः १७ कोटी १४ लाख ८३ हजार (८६), हिंगोली ः ९ कोटी ३८ लाख ५३ हजार (९२), बुलडाणा ः २४ कोटी ६४ लाख ६४ हजार (९९), अकोला ः ११ कोटी ८४ लाख

७५ हजार (९०), वाशीम ः १२ कोटी १४ लाख (९७), अमरावती ः १२ कोटी ५५ लाख (९०), यवतमाळ ः १४ कोटी ५६ लाख १७ हजार (१००), वर्धा ः १० कोटी ७ लाख ८९ हजार (९७), नागपूर ः १२ कोटी ५२ लाख १४ हजार (९८), भंडारा ः ८ कोटी ९५ लाख ७१ हजार (९२), गोंदिया ः १२ कोटी २८ लाख ३३ हजार (९६) चंद्रपूर ः १४ कोटी ५७ लाख ३३ हजार (९८), गडचिरोली ः ११ कोटी ८४ लाख १० हजार (९३)

नगर जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेतून शेती अवजारे, साहित्य खरेदीसाठी अनुदान मागणी पूर्वीपासूनच अधिक आहे.

योजनेतून लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाकडून झालेल्या जनजागृतीचा हा परिणाम आहे. तुलनेने जिल्हा मोठा असून खर्च करण्यात नगर यंदा पुढे आहे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

SCROLL FOR NEXT