Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेत ११ कोटी अनुदानाचे वाटप

राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेतंर्गत २०२१-२०२२ मध्ये १ हजार १०९ लाभार्थ्यांना ६ कोटी ३३ लाख तर २०२२-२०२३ वर्षांत ११२ लाभार्थ्यांना ६४ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
Agriculture Mechnaization
Agriculture MechnaizationAgrowon

नंदुरबार : कृषी विभागामार्फत (Agriculture Department) कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना (National Agriculture Development Scheme) या तीनही योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांत १ हजार ८१६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११ कोटी १२ लाख रुपयांचे तर २०२२-२०२३ या चालू आर्थिक वर्षांत आजपर्यंत २६६ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख रुपये अनुदानाचे (Agriculture Subsidy) वाटप करण्यात आले आहे.

Agriculture Mechnaization
Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं ?

यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत २०२१-२०२२ मध्ये २७२ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख तर २०२२-२०२३ मध्ये ४६ लाभार्थ्यांना १८ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेतंर्गत २०२१-२०२२ मध्ये १ हजार १०९ लाभार्थ्यांना ६ कोटी ३३ लाख तर २०२२-२०२३ वर्षांत ११२ लाभार्थ्यांना ६४ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

Agriculture Mechnaization
Agriculture Mechanization : यांत्रिकीकरणातील ‘तंत्र’ नियंत्रण ः भाग २

तसेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतंर्गत २०२१-२०२२ वर्षांत ४३५ लाभार्थ्यांना ३ कोटी ५७ लाख तर २०२२-२०२३ मध्ये १०८ लाभार्थ्यांना ६१ लाख रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पल्टी नांगर, ट्रॅक्टर ट्रॉली, मिनी दाल मिल, कंम्बाईन हार्वेस्टर, रिपरकमबाईंडर (ट्रॅक्टरचलित) मिनी राइस मिलसाठी कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी https://mahadbtmahait.gov.in पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली एकाच अर्जाद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com