Water Scheme
Water Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Jaljeevan Mission : पंढरपूर, मंगळवेढ्यातील २८ गावच्या पाणी योजनेसाठी २६ कोटीचा निधी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

मंगळवेढा, जि. सोलापूर ः जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत पंढरपूर (Pandharpur) आणि मंगळवेढा तालुक्यातील २८ गावाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी २६ कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. तसेच लवकरच निविदा प्रक्रियेनंतर या कामाला सुरवात होईल, असेही ते म्हणाले.

श्री. आवताडे म्हणाले, की जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनकडे या कामासाठी आपण पाठपुरावा करून आपण योजनेसाठी भरीव निधी आणला. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या या गावातील योजना मोडकळीत आल्या होत्या. अनेक ठिकाणी गळती, दुरुस्ती तर काही ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताचा विषय होता. पण या योजनेमुळे हे सर्व प्रश्न सुटतील. या २८ गावामध्ये पंढरपूर तालुक्यातील सहा आणि मंगळवेढा तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. विशेषतः या गावातील वाड्या-वस्त्यांचा विचारही या योजनेच्या नियोजनामध्ये कऱण्यात आला आहे. त्यामुळे मोठा दिलासा या ग्रामस्थांना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

या २८ गावांचा समावेश

पंढरपूर तालुक्यातील शेटफळ (त), सिद्धेवाडी (चिचुंबे), बोहाळी, शिरगाव, कासेगाव, तनाळी, आणि मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ, आसबेवाडी, मुढवी, सलगर खु, कचरेवाडी, रेवेवाडी, शिरनांदगी, जंगलगी, खुपसंगी, लोणार, महमदाबाद (हु), चिक्कलगी, ढवळस, नंदेश्‍वर, पडोळकरवाडी, जुनोनी, महमदाबाद (शे), मारोळी, तळसंगी, माचणूर, डोंगरगाव, सिद्धापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT