ताज्या बातम्या

Rohit Pawar Latest News: रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला साखर आयुक्तांचा दणका

Sugar Commissionerate : राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना साखर आयुक्तालयाने दणका दिला आहे. पवार यांच्या मालकिच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Team Agrowon

Baramati News : राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना साखर आयुक्तालयाने (Sugar Commissionerate) दणका दिला आहे. पवार यांच्या मालकिच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला (Baramati Agro Sugar Factory) साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखाना सुरू केल्याचा ठपका ठेवत आयुक्तालयाने हा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी साखर आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल, असे निर्देश दिलेले असतानाही पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यात १२ तारखेपासूनच गाळप सुरू करण्यात आल्याची तक्रार शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती.

तसेच या प्रकरणी रोहित पवार यांच्या कारखान्याच्या चौकशीचीही मागणीही शिंदे यांनी केली होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शिंदे यांनी याबाबतचे निवेदनही दिले होते.

यावर्षीच्या गाळप हंगामासाठी राज्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपूर्वी सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यापूर्वी कारखाना सुरू केल्यास दुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. असे असतानाही कारखाना सुरू केल्याची तक्रार शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती.

दरम्यान, ठरवून दिलेल्या तारखेच्या दोन दिवस आधी कारखाना सुरू केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्या मालकीच्या साखर कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आली. याप्रकरणी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चौकशी करण्यासाठी साखर आयुक्तांनी समिती नेमली होती. या प्रकरणाच्या चौकशींनंतर रोहित पवार यांना क्लिन चीट देण्यात आली. मात्र, या प्रकरणात चौकशी अधिकारी असलेल्या अजय देशमुख यांचे यानंतर निलंबन करण्यात आले.

त्यानंतर राम शिंदे यांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गुळवे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता राज्याचे साखऱ आयुक्तांनी बारामती अॅग्रो साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांना १७ कोटींचा विमा परतावा

Livestock Competition: लिंबोटीचा लालकंधारी वळू ठरला चॅम्पियन

Agriculture Crisis: अनियमित विजेमुळे रब्बी पिके धोक्यात

Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT