Indrayani River Pollution Agrowon
ताज्या बातम्या

Water Pollution : रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे इंद्रायणी फेसाळली; शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

राज्य सरकार असेल किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ निवेदने घेऊन गप्प बसण्यापलीकडे काहीच कारवाई किंवा इंद्रायणी संवर्धनासाठी काम करत नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Indrayani River Pollution आळंदी : येथील (ता. खेड) इंद्रायणी नदी (Indrayani River) रसायनयुक्त सांडपाणी (Chemical Water) सोडल्यामुळे पुन्हा फेसाळली. आठवड्यातून किमान दोनदा मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित (River Polution) होत आहे. हा गंभीर प्रश्‍न कायमचा मिटविण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.

राज्यसरकार असेल किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ निवेदने घेऊन गप्प बसण्यापलीकडे काहीच कारवाई किंवा इंद्रायणी संवर्धनासाठी काम करत नसल्याचे चित्र आहे.

परिणामी आळंदीत नागरिकांना आणि भाविकांना मात्र प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना घाणेरड्या पाण्यातच तीर्थस्नान करावे लागत आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इंद्रायणीकाठच्या गावांमध्ये निर्माण झाला आहे

पिंपरी-चिंचवड महापिलिकेकडून लाखो रुपयांच्या निविदा जलपर्णी हटविण्यासाठी काढल्या जातात. दुसरीकडे चिखली कुदळवाडी भागातील येणारे सांडपाणी मात्र अडवण्यासाठी महापालिका काहीच करत नसल्याचे चित्र आहे.

देहू, तळेगाव, कामशेत एवढेच काय आळंदी पालिकादेखील सांडपाणी थेट नदीत सोडत आहे.

नदी संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळविल्याचा डंका मिरविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतूनच दररोज लाखो लिटरचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट इंद्रायणी पात्रात मिसळले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT