Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Sindhudurg Rain : संततधारेमुळे पूरस्थितीची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. संततधारेमुळे पूरस्थितीची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला.

जिल्ह्यात गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. मंगळवार (ता. २५) दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. सायंकाळी जिल्ह्याच्या सर्व भागांत सरीवर सरी कोसळत होत्या. अनेक भागांत वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकारदेखील झाले. त्यानंतर करात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले.

बुधवार पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून २४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. याशिवाय इतर मध्यम आणि लघु प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.

त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी ४०.४० मीटरवर पोहोचली आहे. याशिवाय कर्ली, वाघोटन, गडनदी, तेरेखोल या सर्व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

धबधब्यावर जाताना सावधगिरी बाळगा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी शेकडो पर्यटक सिंधुदुर्गात येतात. आंबोलीत हजारो पर्यटक येत असतात. परंतु दोन तीन दिवसांपूर्वी गोव्यातील ४० पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे घारपी (ता. दोडामार्ग) येथील धबधब्यावर अडकले होते.

याशिवाय चौकुळ धबधब्यावरदेखील २४ पर्यटक अडकले होते. दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांना प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले. मात्र असे प्रकार घडू नयेत म्हणून पर्यटकांनी धबधब्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT