Paddy Crop Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : पेणमध्येही भात पिकाला फटका

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दाणादाण उडवली असताना पेण तालुक्यातही उभी पिके आडवी होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.

टीम ॲग्रोवन

पेण : आठ दिवसांपासून हस्त नक्षत्राचा जोरदार पाउस सुरू आहे. त्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दाणादाण (Heavy Rainfall) उडवली असताना पेण तालुक्यातही (Pen Taluka) उभी पिके आडवी होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. यामुळे भातशेती नुकसानीचा (Crop Damage) धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे.

यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच जोरदार सुरुवात केली. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पाऊस समाधानकारक झाल्याने तालुक्यातील जवळपास १२ ते १३ हजार हेक्टर जमीन भात लागवडीखाली आहे. येथील सर्व भातपिके चांगली झाली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा चांगला खुशीत आहे.

येथील शेतकऱ्यांनी कर्जत, कोलम, वाडा कोलम, जया, रत्ना, अवनी या विविध जातींच्या भातांची लागवड केली असून, ही पिके नवरात्रोत्सवानंतर चार-आठ दिवसांनी कापणीयोग्य होतात. अनेक भातपिकांची कणसे बाहेर येऊन कसदार आणि उत्तम बनत गेली आहे.

परंतु हस्त नक्षत्राचा पाऊस पेण तालुक्यात सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पिके आडवी होण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे.

पेण तालुक्यामध्ये भातशेती चांगल्या प्रकारे आली आहे. हस्त नक्षत्राच्या पावसामुळे हे पीक वाया जाण्याची भीती वाटत आहे. एककीडे शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे. जर पाऊस सतत पडत राहिला, तर उभी पिके आडवी होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी.

- किरण म्हात्रे, शेतकरी, दिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Suhana Khan Farmland: शाहरुखची लेक सुहाना शेतजमीन खरेदी प्रकरणात आली अडचणीत

Solar Spraying Pump Scheme: वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा; सौर फवारणी पंप खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा

Crop Insurance: खरीप पीक विम्याचे ८ लाख ६० हजार अर्ज

OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध; मंत्रिमंडळ बैठकीला पाठ

Krishi Vigyan Kendra: कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बांधावर

SCROLL FOR NEXT