Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy : मावळात साडेतेरा हजार हेक्टरवर भात लागवड

मावळ तालुका हा भात पिकांचे आगार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात चालू वर्षी सुमारे १३ हजार ५०० हेक्टरवर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : मावळ तालुका हा भात पिकांचे आगार (Paddy Crop Hub) म्हणून ओळखला जातो. तालुक्यात चालू वर्षी सुमारे १३ हजार ५०० हेक्टरवर भात पिकांची लागवड (Paddy Cultivation) करण्यात आली आहे. ही लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पिकांची वाढ चांगली असल्याने उत्पादनात (Paddy Production) वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मावळ तालुक्यात शेतकरी आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी एप्रिल महिन्यापासून नियोजन करीत असतो. लहरी हवामानातही अनेक अडचणींचा सामना करून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकरी घेतात. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात काही ठिकाणी भात लागवडी पावसाअभावी रखडल्या होत्या. मात्र आता पावसाच्या हजेरीने लागवडीला जोर आला आहे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात बियाण्यांसह कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरुची, वैष्णवी व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाण्यांच्या वाणालाही मावळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मावळातील पश्‍चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भात प्रकारांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. तर मावळ तालुक्यात पारंपरिक चारसूत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे.

मावळ तालुक्यात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने भात लागवडी केल्या आहेत. यामध्ये चारसूत्री, एसआरटी, यांत्रिकीकरण पद्धतीचा समावेश आहे. मावळ तालुक्यात तीनही काळे कॉलनी, वडगाव, खडकाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रात यंदा चार ते साडेचार हजार हेक्टरवर आधुनिक पद्धतीने भात लागवडीचे नियोजन आले होते. आता ही लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.

- दत्तात्रेय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ

यंदा अडीच एकरांवर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली आहे. त्यासाठी खते, बियाण्यांचे नियोजन मे महिन्यात केले होते. यंदा भात लागवडीसाठी पाच ठिकाणी दीड ते दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका केल्या होत्या. गेल्या महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे भात लागवडी वेळेवर झाल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

- रोहिदास लखिमले, शेतकरी, भोयरे, मावळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT