Bhusawal News : बोदवड महसूल विभागाचे शेलवड येथील कर्मचारी तहसीलदारांच्या सूचनेनुसार अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळूमाफियांनी महसूल कर्मचारी गजानन अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली व ट्रॅक्टर पळवून नेले.
ही घटना मंगळवारी (ता.१२) रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला असून, याबाबत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महसूल विभागाचे शेलवड (ता. बोदवड) येथील कोतवाल गजानन सुभाष अहिरे हे तहसीलदारांच्या सूचनेनुसार अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी जात असताना बोदवड येथील तहसीलदार हे एका कामानिमित्त काही अंतरावर गेले असता वाळूमाफियांनी बोदवड शहर जुन्या तहसील कार्यालयाजवळ गजानन अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टर पळवून नेले.
त्यात कोतवाल गंभीर जखमी होऊन झालेल्या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान, कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून हल्ल्याच्या घटना सुरूच असून, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी कडक धोरण अवलंबावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
महसूल कर्मचाऱ्यांकडून निषेध
सदर घटनेबाबत बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर संशयित फरारी झाला आहे. आरोपींना तत्काळ अटक होऊन एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच झालेल्या घटनेबाबत जाहीर निषेध करण्यात आला. संशयित आरोपी १३ सप्टेंबरपर्यंत अटक न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी १४ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करतील, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला.
याबाबत कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांच्या नेतृत्वात निवासी नायब तहसीलदार शोभा घुले यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुकाध्यक्ष विनोद इंगळे, संजय गोसावी, दीपक पाटील, रवींद्र धांडे, प्रकाश अहिरे, नीलेश कोळी, गणेश कोळी व तालुक्यातील कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.