Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यातील ‘लम्पी स्कीन’बाबतचे निर्बंध शिथिल

जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनास लम्पी स्कीन चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्राण्यांमधील सांसर्गिक रोगास प्रतिबंधासाठी लागू केलेले निर्बंध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शिथिल केले.

Team Agrowon



अॅग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनास लम्पी स्कीन चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्राण्यांमधील सांसर्गिक रोगास प्रतिबंधासाठी लागू केलेले निर्बंध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शिथिल केले.

जिल्ह्यातील कोणताही प्राणी बाजार भरविण्यासाठी, तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी पुढील अटी बंधनकारक असून, त्या नियमांतर्गत परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक करण्यासाठी गुरांचे (गो-वर्गीय प्रजातीचे सर्व प्राणी) किमान २८ दिवसांपूर्वी लम्पी स्कीन रोगाचे लसीकरण झालेले असावे.

पशुवैद्यकीय अधिकारी यांचे लसीकरण प्रमाणपत्र तसेच लम्पी स्कीन रोगाची लक्षणे दिसून आली नसल्याबाबतचे पशुधन विकास अधिकारी, गट- अ यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार असून, प्राणी वाहतूक करणाऱ्या प्राण्यांचे- स्वास्थ्य प्रमाणपत्र, प्राण्यांचे-वाहतूक प्रमाणपत्र वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात १२ अंकी टॅग असणे आवश्‍यक आहे.

तसेच त्याची इनाफ पोर्टलवर नोंदणी बंधनकारक असणार आहे. जिल्ह्यातील पशुबाजारामध्ये खरेदी व विक्री करताना कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत व इतर क्षेत्रात प्राण्यांच्या कानात टॅग व स्वास्थ्य प्रमाणपत्र बंधनकारक राहील.

तसेच बाजारामध्ये जंतुनाशक फवारणी करणे बाजार समितीस किंवा आयोजकास बंधनकारक राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT