Agriculture Inputs complaints Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : व्हॉटस्ॲपवर नोंदवा निविष्ठाविषयक तक्रारी

Commissionerate of Agriculture : कृषी आयुक्तालयाचा उपक्रम

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Agriculture Inputs complaints : पुणे ः रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाण्यांबाबत समस्या असल्यास शेतकरी थेट व्हॉटस्ॲपद्वारे तक्रार नोंदवू शकतील, असे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.
निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपात गुणवत्तापूर्ण निविष्ठा (Agriculture Inputs complaints) मिळाव्यात यासाठी गुणनियंत्रण विभागाकडून नियोजन केले जात आहे. मात्र निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी किंवा लिंकींग याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असू शकतात. या तक्रारींची दखल घेण्यासाठी कृषी विभागाने २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष, तीन भ्रमणध्वनी क्रमांक, एक टोल फ्री क्रमांक व ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निविष्ठाविषयक तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील साध्या कागदावर लिहावा. या कागदाचे छायाचित्र काढून ते आयुक्तालयाकडे व्हॉटस्ॲपद्वारे पाठवावे. ते शक्य नसल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५० या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तोंडी तक्रारदेखील करता येईल, असे गुणनियंत्रण विभागाने स्पष्ट केले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी आयुक्तालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा कक्ष २४ तास सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १८००२३३४००० या टोलफ्री क्रमांकावर सुद्धा राज्यातील शेतकरी संपर्क करू शकतील. याशिवाय controlroom.qc.maharashtra@gmail.com या ईमेलवर तक्रार करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव

Paddy Crop Damage: नाशिकमधील भात उत्पादक शेतकरी संकटात

Hawaman Andaj: पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात किमान तापमानात होतेय घट

Sugarcane Harvest: वहागावमध्ये शेतकऱ्यांकडून ऊसतोडीसाठी नियमावली

Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक

SCROLL FOR NEXT