Paady Agrowon
ताज्या बातम्या

Bhat Lagwad : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातरोपे पुनर्लागवडीला सुरूवात

Paddy Seedling : पावसाला सुरवात झाल्यामुळे भातरोपे पुनर्लागवडीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. या भात रोपवाटिका मेअखेरीस तयार केल्या होत्या.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाला सुरवात झाल्यामुळे भातरोपे पुनर्लागवडीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. या भात रोपवाटिका मेअखेरीस तयार केल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील १० टक्क्यांहून अधिक भात रोपवाटिकांमधील रोपांची पुनर्लागवड सुरू झाली आहे. या लागवडीला दहा दिवस विलंब झाला आहे.

जिल्ह्यात तीन टप्प्यांत भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पाणी उपलब्ध असणारे शेतकरी २० मेपर्यंत भातरोपवाटिका तयार करतात. तर काही शेतकरी मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर, तर उर्वरित शेतकरी मॉन्सून सुरू झाल्यानंतर भात रोपवाटिका तयार करतात. यावर्षी हळवा, निमगरवा आणि गरवा अशा बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये संकरित, सुधारित आणि पारंपरिक बियाण्यांचा देखील समावेश आहे.

यावर्षी १० टक्के शेतकऱ्यांनी २० मे च्या सुमारास रोपवाटिका तयार केल्या. ही रोपे ८ ते १० जूनच्या दरम्यान लागवडीस तयार झाली. परंतु पावसाअभावी पुनर्लागवड करणे शक्य झाले नाही. २४ जूनपासून पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस जिल्ह्यांच्या सर्व भागात दमदार पाऊस पडत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे पुर्नलागवडीला सुरवात केली आहे. कणकवली तालुक्यातील चिंचवली, खारेपाटण, शेर्पे या गावांत मोठ्या प्रमाणात रोपवाटिका २० ते २५ मे या कालावधीत तयार केल्या. या शेतकऱ्यांसह कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात १० टक्के क्षेत्रावरील पुनर्लागवड येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल.

मुख्य पुनर्लागवडीला विलंब होणार

११ जूनला मॉन्सूनच्या आगमनानंतर एक दोन दिवसांत ४० टक्के क्षेत्रावर भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या. त्यानंतर २४ आणि २५ जूनला उर्वरित भात रोपवाटिका झाल्या. त्यातील रोपे पुर्नलागवडीस तयार होण्यास अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुख्य पुर्नलागवडीस प्रारंभ होईल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT