Safflower Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Safflower Cultivation : साखरखेर्डा परिसरात करडई लागवडीकडे पुन्हा कल

आरोग्याच्या दृष्टीने करडई फायदेशीर मानली जाते. मात्र हे पीक वर्षानुवर्षे कालबाह्य झाले होते. आता पुन्हा त्याची लागवड केली जात आहे.

टीम ॲग्रोवन

साखरखेर्डा, जि. बुलडाणा ः या परिसरात रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) करडईचा पेरा (Safflower Sowing) वाढत असून, यंदाच्या हंगामात जवळपास ५२ हेक्टरवर लागवड (Safflower Cultivation) झाल्याचे समजते. पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी ही कालबाह्य झालेली पिके पुन्हा नव्याने घेऊ लागले आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने करडई फायदेशीर मानली जाते. मात्र हे पीक वर्षानुवर्षे कालबाह्य झाले होते. आता पुन्हा त्याची लागवड केली जात आहे. कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे व कृषी सहाय्यक संग्राम चेके यांनी याबाबत कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली.

कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मागील वर्षापेक्षा यावर्षी करडीच्या पेऱ्यात वाढ होताना दिसून आली. करडई विदर्भात रब्बी हंगामातील महत्त्वाचे कोरडवाहू पीक होते. १५ ते २० वर्षांपूर्वी पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जात होती. साधारणतः ७५ ते ८० दिवसांत पीक फुलोऱ्यावर येते.

सुमारे १२५ ते १३० दिवसांनी परिपक्व झाल्यावर त्या फुलाची बोंडे तयार होऊन त्यात तेलयुक्त पांढऱ्या करडी तयार होतात. करडईच्या १०० दाण्यांचे वजन ५ ते ७ ग्रॅम असते. यात ३० टक्के तेल, ६५ ते ७० टक्के ढेप मिळते. हेक्टरी अंदाजे १५ ते २० क्विंटल उत्पादन होते. करडीच्या झाडांना टोकदार काटे असल्याने सोंगणी करण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी मजूर लागतात. पूर्वी खामगाव, अकोला, जालना, साखरखेर्डा, मेहकर, लोणार या भागांत करडई तेल व ढेपेच्या व्यापारी पेठा होत्या.

रब्बी हंगामात आरोग्यादायी करडई पिकाची पेरणी करण्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला साखरखेर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दर वर्षी करडई पेऱ्यात वाढ होत आहे.
वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा
माझे वडील, आजोबा पूर्वी करडईची पेरणी मोठ्या क्षेत्रावर करायचे. २०० ते २५० क्विंटल उत्पादन व्हायचे. मध्यंतरी बुरशीमुळे करडई उभळू लागल्याने लागवड बंद केली होते. मागील तीन-चार वर्षांपासून पुन्हा दोन-तीन एकर क्षेत्रात पेरणी सुरू केली असून, घरचेच तेल खात आहे.
सुधीर बेंदाडे, शेतकरी, साखरखेर्डा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT