Kolhapur News : शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील छोट्या मोठ्या पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर प्रागतीक पक्षांचा काल महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे मेळावा पार पडला. यावेळी विवीध संघटना पक्षांचे नेते उपस्थित होते.
यावेळी प्रागतीक पक्षाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत. इंडिया आघाडीला प्रागतीक पक्षांची ताकद काय आहे याची आठवण करू दिली. दरम्यान ते म्हणाले की, प्रागतिक पक्षांची मते इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू शकतात. त्यामुळेच आता सर्व प्रागतिक पक्षांचे मोदी हटाव हे एकच लक्ष्य असले पाहिजे', असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले.
तसेच 'प्रागतिक पक्षांची आघाडी ही केवळ निवडणुकीसाठी नाही. ती पूर्वीपासून आहे. माजी खासदार राजू शेट्टी, कॉ. ढवळे यांनी प्रागतिक पक्षांची आघाडी बनवली. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हा या आघाडीचा उद्देश आहे. सध्या देशामध्ये अत्यंत चिंताजनक वातावरण आहे.
देशात आता एका पक्षाची सत्ता येणार नाही. आता आघाडीची सत्ता येणार आहे. त्या दृष्टीकोनातूनच प्रागतिक पक्षांची आघाडी बनवण्यात आली. ही तिसरी आघाडी नसून आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे असे वयक्तीक मत जयंत पाटील यांनी मांडले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, 'प्रागतिक पक्षांची मोट ही पूर्वीपासून बांधली आहे. कारण सत्ताधाऱ्यांवर हे प्रागतिक पक्षच अंकुश ठेवू शकतात. कारण, त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ईडी, सीबीआयची भीती नसते. हे सगळे रस्त्यावरचा संघर्ष करणारे पक्ष आहेत. या पक्षांच्या चळवळीमुळेच सामान्यांच्या हिताचे कायदे सत्ताधाऱ्यांनी केले.
एकेकाळी मधू दंडवते यांच्यासारखे मातब्बर नेते सभागृहात होते. पण त्यांचा पराभव कोणी केला. जिल्ह्यातील संपतराव पवार-पाटील, श्रीपतराव शिंदे यांचा पराभव काँग्रेसने केला. त्यावेळी त्यांना चळवळ अठवली नाही का? प्रागतिक पक्षांचा एक एक बुरूज ढासळला त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते का गप्प होते ?, धरणग्रस्तांचे प्रश्न का सुटले नाहीत?, यावर आधी त्यांना त्यांची भूमिका विचारली पाहिजे. त्यानंतरच काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला पाहिजे असे परखड मत शेट्टी यांनी मांडले.
'मी इंडिया आघाडीत जायचे की एनडीएमध्ये जायचे याचा निर्णय अद्याप केलेला नाही. शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलची धोरणे स्पष्ट केल्यावरच कोणत्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे ठरवेन,' असेही शेट्टी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.