Raju Shetti : तर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा ऊस दरासाठी एल्गार

Sugarcane Farmers : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रतिटन जादा द्यावेत; अन्यथा कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon
Published on
Updated on

Raju Shetti News : मागच्या हंगामातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रतिटन जादा द्यावेत; अन्यथा कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. या मागणीसाठी पुढच्या महिन्यातील १३ सप्टेंबर २०२३ रोजी साखर उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही माहिती शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी शेट्टी म्हणाले की, मागचा साखरेचा गळीत हंगाम सुरू झाला त्यावेळी ३१०० रुपये भाव होता. आता साखरेचे दर ३८०० ते ३९०० रुपये पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी साखरेचा दर ३६०० रुपये धरला तरी साखर कारखान्यांना टनाला ६०० ते ७०० रुपये जादा मिळणार आहेत. यातील शेतकऱ्यांना किमान ४०० रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. साखर कारखान्यांना देणे हे शक्य आहे. यामध्ये राज्यातील किमान ६० ते ७० कारखाने ही रक्कम देऊ शकतात, असेही शेट्टी म्हणाले.

कर्नाटक सरकारने एफआरपीपेक्षा १५० ते २५० रुपये जादा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु साखर कारखान्यांनी त्याला स्थगिती मिळावी म्हणून बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

खताच्या वाढत्या किमती, पाणी टंचाई यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन एकरी सात ते आठ टनाने घटणार आहे. त्यामुळे चांगले कारखाने जास्तीत जास्त ९० ते १०० दिवस चालू शकतील. अन्य कारखान्यांचा एक- दीड महिन्यातच गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होणार आहे. त्यामुळे यासाठी संघटनेने न्यायालयीन लढाई लढण्याचेही ठरविले असल्याचे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींना 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला आमंत्रण, शेट्टींनी केला खुलासा

साखर आयुक्तांनी डिजिटल वजनकाटे बसविण्याचा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी सर्व साखर कारखान्यांनी करावी, अशी मागणीही या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, राजेंद्र गड्ड्याण्णावर, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com