Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मदतनिधी वितरण रखडले

नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरवरील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सात लाख ४१ हजार शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरवरील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage) झाले होते. यात बाधितांना लागणारा ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी (ता. २१) सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

तत्काळ निधी सोळा तालुक्यांना वितरित केला आहे. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वितरित होणार आहे. निधी वितरित दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी होवूनही अद्याप भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.

जिल्ह्यात यंदा जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळांत एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली.

सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरील फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला.

या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी (ता. २१) सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरित केला. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वितरित होणार आहे. निधी वितरित होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी होवूनही अद्याप भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी निधी वाटपाची शक्यता धूसर झाली आहे.

तालुकानिहाय वितरित केलेला निधी (रुपयांत)

नांदेड-२५ कोटी ८९ लाख ५२,२००, अर्धापूर-२९ कोटी १६ लाख ५२,०००, कंधार-५५ कोटी १२ लाख ६०,०००, लोहा-६१ कोटी ५, लाख ४,०००, देगलूर -४२ कोटी ९५ लाख ४,८००, मुखेड-५४ कोटी ७० लाखक १९,२००, बिलोली-४० कोटी ३५ लाख ३९,२००, नायगाव - ४१ कोटी ५ लाख ४७,०००, धर्माबाद-२९ कोटी ५३ लाख ९८,८००, उमरी-४० कोटी ११ लाख ३२,०००, भोकर-५२ कोटी ४३ लाख ७,२००, मुदखेड-२४ कोटी २७ लाख ५,६००, हदगाव-८५ कोटी २० लाख २८,०००, हिमायतनगर-४२ कोटी ७४ लाख ७,२००, किनवट-६७ कोटी ९ लाख १५,२००, माहूर-२२ कोटी २० लाख १९,२००, एकूण ः ७१७ कोटी ८८ लाख ९१,६००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT